नमस्कार मंडळी.
कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे गेली दोन वर्षे आपण दही हंडी, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असे एक ना अनेक सण सामूहिकपणे, मनमोकळेपणाने साजरे करू शकलो नाहीत. आणि म्हणूनच त्याचे उट्ट या वर्षी निघत आहे. या सर्व हर्ष, ऊल्हासाचे प्रतिबिंब आपल्या पोर्टलवर दिसून येत आहेच. असो…
या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपली स्नेहांकित
टीम एनएसटी
सहा सोसायट्या मिळून एक गणपतीही अभिनव कल्पना. यातून सांघिक भावना तर बळकट होईलच. पण अनेक पर्यावरणवादी घटकांचेही संरक्षण होईल.
– राधिका भांडारकर. अमेरिका
देवेंद्र भुजबळजी,
“सहा सोसायट्या एक गणपती” हा फार चांगला कार्यक्रम आहे. खूप सुंदर कल्पना आहे. असं जर सर्व मुंबईत झालं तर फार छान होईल.
– शाहीर दत्ताराम म्हात्रे
ऋतुजाने अमेरीकेमध्ये मराठी झेंडा लाऊन बापु व बेबीताई तुमच्या जीवनांत अमोलिक असे समाधान
नुसते समाधान नव्हे आई वडिलानां खुप मोठ्ठां सनमान बहाल केला आहे.
अभिमान वाटतं आहे आम्हा सामान्यानां, आम्हांला एवढं कौतुक वाटतयं तुम्हां दोघांच काळीज सुपाएवढंं मोठ्ठं झालं असेल !!!!
ऋतुजा तुझं कौतुक कोणत्या शब्दातं कराव कळत नाही. तुझ्यासारखं रत्नं पोटी असेल तरं तुझ्या मातापित्यानां फिरून जन्मास यावे व तुझ्यासारखी सर्व संपन्न गुणी मुलं जन्माला यावी. शक्य असतं तरं एकाद्यी सुरेख कविता केली असती. कविता करतानां शब्द भांडार कमी पडेल.
मी एक अनपढ तुझ्या मामीची बहिण त्यामुळे तुझी मामी सुवर्णा तिच्या तोडूनं तुझ्या विषयी ती भरभरून
बोलताना तिच्या तोंडात तिळ भिजत नाही. आजोळी सर्वानाच तुझं कौतुक आहे हे मी तुला सांगायला नको
सौ रश्मी हेडे यांचा लेख वाचला आणि राहवलं नाही
तुझ खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा.
ति बापु व ताई तुमचंही हर्दिक खुप खुप अभिनंदन!!!!
– सुरेखा तिवाटणे. पुणे
ऋतुजा…. हिचे बालपणापासून तर आतापर्यन्तचा धावता परिचय फारच छान व्यक्त केला. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभूतपूर्व यश संपादन करून भारतातच नव्हे तर साता समुद्रापार सुध्दा मराठी झेंडा.. फडकाविला. लेख वाचून खरंच अभिमान वाटतो.
अशीच भावी आयुष्यात प्रगति लाभो.
ऋतुजा ताईचे व छान परिचय करून दिल्याबद्दल रश्मी ताई दोघींचेही मनापासुन अभिनंदन.. 🎉
– सुभाष कासार. नवी मुंबई.
धन्यवाद रश्मी आणि देवेंद्र. रश्मीने खूप मेहनत घेऊन हा लेख लिहीला आहे. ऋतुजाचे यथार्थ वर्णन केले आहे. खूप बारकावे, छंद अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे .या लेखामुळे आमच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. प्रत्यक्ष भेटून सविस्तर बोलू. सातारा येथे येऊ. तारीख नंतर सांगेन आभारी आहोत.
आपल्या भेटीचा योग लवकर यावा असे वाटत आहे.
– प्रा शिवाजी इंदापूरे. पुणे
वाचक लिहितात 👌🏻आवडते सदर आहे माझे.
– परवीन कौसर. बंगलोर
दातांचे महत्त्वाचे, वर्णन, व दातांची महती छान सांगितली आहे.
– विलास प्रधान. मुंबई.
Very Nice n Short America Vari Story. I think Hurricare Mentioned by Him was Named SANDY. It was in 2013. Photo of Statue of Liberty is Very Nice, But I Think it has Been Cut Pasted as Statue of Liberty is facing New York. They Should Have Visited Staten Island Also, The Only thing That is Free in America in Ferry to Staten Island. Times Square is Actually Nothing, But For Sure Atmosphere is Great and Charged Up, Visiting in Night is More Fun. Late Night there are naked Models, People can Take Photo With Them. When This was Heard, My Wife and Her Sister Just Won’t Allow Myself and Sadu to Stay There Late Night. Ha Ha Ha.
– Captain Abhyankar (Retd)
राजेंद्र घरत ह्यांनी दंतकथा हलकं फुलकं ह्या शब्दांना साजेशी लिहिली आहे. दातदुखी सुरू झाल्यावर काय होत त्याच खरखुर तसच विनोदी अंगाने केलेलं वर्णन अतिशय आवडल. त्यांचं अभिनंदन….
ऋतुजा इंदापूरे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. तिची प्रत्येक क्षेत्रातील घोडदौड बघून अतिशय कौतुक वाटले. अमेरिकेत जाऊनही तिने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. मराठी मुलीचा हा प्रवास अभिमानास्पद आहे. तिला अनेक शुभेच्छा..
– सुनंदा पानसे. पुणे
डॉ राणी खेडीकर यांचा “कान्हा” खूप खोलवर परिणाम करुन गेला.
– प्रा डॉ अजित मगदूम. नवी मुंबई.
भुजबळ साहेब श्री म माटे यांच्याबद्दलच्या लेखाने माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. कारण मी त्यांच्या लिखाणाचे नेहमीच वाचन करीत असे. मात्र आता ते दिवसच गेले याची खंत वाटते.
– निरंजन राऊत
निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक (माहिती), मुंबई.
Truly enlightened and amazing personality.
– Vidya Joglekar. USA.
नमस्कार.
श्री म.माटे यांच्या विषयी छान माहिती.
अध्यात्म मधील पंचभूतांचा पतंग, हा लेख फार भावला.
महानुभावांचे योगदान, हा प्रा डॉ विजया राऊत यांचा लेख अतिशय माहितीपूर्ण आहे.
कविता _खोके, बोके, ओक्के, शालुतून जोडा मारणारी आहे.
“भूगोलाचे मास्तर” ही कथा आवडली.
शिक्षकांसाठी खास स्पर्धा, विसूभाउंचा उपक्रम छान.
ती आणि गौराई कथा खुपच भावली .
भावलेली गाणी, आणि कविता पण छान.
साऱ्यांसाठी धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
– आशा दळवी. फलटण, सातारा
खोके, बोके, ओक्के आणि धोके ही वास्तवाचे भीषण वर्णन करणारी परिणामकारक कविता. राजकीय नेत्यांनी जो जनतेच्या भविष्याविषयी जो खेळ चालवला आहे त्यामुळे सामाजिक संस्कृती, राजकीय संस्कृती आणि सामान्य माणसाचे धोक्यात असलेले भविष्य बघून, त्या जखमा बघून कविवर्य आपण आतून हलला असाल, दुःखी झाला असाल ते आपले दुःखाश्रू शब्दरूप घेऊन बाहेर ओघळले आहेत. जबरदस्त कविता.
– अशोक सावंत
संपादक – हॅलो सखी, समुद्र मुंबई
शिक्षक दिनाच्या निमित्ताने “भूगोलाचे, मास्तर” हा छान लेख वाचायला मिळाला. धन्यवाद.
– विलास प्रधान. कामगार नेते. आर सी एफ. मुंबई
डॉ. केशव साठ्ये यांचा ऊपेक्षितांचे अंतरंग हा सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. म. माटे यांचा लेख वाचनीय.
खोके बोके ओके धक्के…मस्त ऊपहासात्मक विनोदी काव्य..
ती आणि गौराई हा सविता कोकीळ यांचा लेख अतिशय आवडला. कुठल्याही व्रतामागची भूमिका काय असावी हे या लेखातून त्यांनी अतिशय सुंदर रित्या मांडले आहे..
मुंबईतील पहिला गणेशोत्सव हा दिलीप चावरे यांचा लेख खूप माहितीपूर्ण आहे.
जुन्या काळातल्या गणेशोत्सवाच्या आठवणी वाचताना मन रमले. योग्य छायाचित्रामुळे हा लेख अधिकच वाचनीय आणि मनोरंजक वाटला..
– राधिका भांडारकर. अमेरिका
भूगोलाचे मास्तर … अतिशय हृद्य.
ती आणि गौराई एक वेगळाच चांगला कंगोरा दाखविणारी .🎂
देवा हो देवा …गीतामुळे रम्य बालपण आठवले.. लेख चांगला जमलाय.
श्री प्रवीण यांची कविता आवडली.
नेत्रदानासाठी योजलेला अभिनव उपक्रम भावला.
मी एक युद्ध कैदी …. पुस्तक परिचय आवडले.. वाचण्याची इच्छा आहे
गणेशवेल ..कळीचा प्रवास, उमलणे… छायाचित्रांसह सुंदर वाटले.
मन पाखरू पाखरू …
काव्य बहिणाबाईंची आठवण करून देणारे ..छान
– स्वाती वर्तक. मुंबई.
“ती” आणि “गौराई”.. गृहिणीची अस्वस्थता, हूरहुर दूर करणारी कथा आहे. कुटुंबातील सर्वांचे प्रबोधन करुन समाधानी जीवनाचे सहजपणे धडे देणारी उत्तम कथा आहे.
– राम खाकाळ. निवृत्त निर्माता. मुंबई दूरदर्शन
ती आणि गौराई…… छान लेख.
गणेशवेल…..आजवर कधीही न ऐकलेली पाहिलेली वेल…..छान ओळख झाली.
– डॉ किरण चित्रे. दूरदर्शन निर्माती. ह. मु. अमेरिका.
शिक्षकांचे गुण वर्णन मनाला सुगंधीत करून गेले.. ते कसेही असले तरी आई वडीलांचे जागेवर आहे. तेव्हा सर्व गुरू जनांना दंडवत..
विलास कुडके यांचे पुस्तक परीक्षण, “मी एक युद्ध कैदी”, वाचनीय आहे. पूर्वी ते नवल मासिकात प्रसिद्ध झाले आहे. काही भाग तेव्हा माझ्या वाचनात आले होते.
“मुंबईतील पहिला गणेशोत्सव” हा दिलीप चावरे यांचा लेख संग्रहणीय झाला आहे. कारण मुंबई नंतरच इतरत्र हा उत्सव सुरु झाला असावा. लेखक, संपादकांचे अभिनंदन.. ..🌹🙏🌹
– सुधाकर धारव.
निवृत्त माहिती उपसंचालक. यवतमाळ.
