वृक्षारोपण करणं असतं खूप सोपं ! पण त्यांची निगा राखणं, त्यांचं संवर्धन करणं खरचं सोपं नसतं !!…
रायगड जिल्ह्यातील उरण सारडे येथील कोमनादेवी डोंगर पायथ्याशी एका छोट्याश्या ओसाड, दाता नावाच्या टेकडीवर पाच वर्षांपूर्वी लागवड केलेली शेकडो इवलीशी रोपटी आज चांगल्या प्रकारे बहरलेली दिसतात, जोमाने वाढलेली दिसतात.
कोमनादेवी ऑक्सिजन पार्कच्या रूपाने आज आजूबाजूच्या परिसरात एक पिकनिक स्पॉट म्हणून नावारूपाला येतानां दिसतोय !…
पण त्या ओसाड माळरानावर आज बहरलेली ती वनसंपदा बहरण्यामागे त्या इवल्याश्या रोपाट्यांच्या जगविण्यामागे सर्वांनी घेतलेली खूप सारी मेहनत, अपार कष्ट आणि प्रत्येकाने मनाशी बाळगलेली जिद्द याचा उल्लेख करावाच लागेल. काही झालं तरी आपण आणि आपल्या सारख्या अनेक निसर्गप्रेमी सहकाऱ्यांनी लागवड केलेली ही वनसंपदा आपण मात्र … जगवायचीच !….
हे करत असतानां सतत चार वर्षे अनेक भयानक प्रसंगांना समोर जावं लागलं. म्हणजे दरवर्षी कुणीतरी समाजकंटक त्या परिसरात आग (वणवा) लावून ही वनसंपदा जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न करत असे. हे कृत्य करून त्यांना काय असुरी आनंद मिळतो हे त्यांनाच ठाऊक …पण हे सर्व बघतांना आमचं मन मात्र सुन्न व्हायचं …. हृदय पिळवटून जायचं …कारण आम्हीं ह्या वनसंपदेला अगदी लहान मुलांसारखं वाढवलेलं आहे ! जपलेलं आहे !!…म्हणूनच जेव्हा, जेव्हा आगीत जळून खाक होणारी ती इवलीशी रोपटी बघायचो (सतत तीन वर्षे ही परिस्थिती आम्हीं प्रत्यक्ष अनुभवलीय) …तेव्हा आमच्या डोळ्यांतुन आपसूकच पाण्याच्या धारा वाहू लागायच्या !…
कारण … आम्ही सर्वांनी, आमच्या सर्व सहकाऱ्यांनी, आमच्या लहान चिमुकल्यानी, आमच्या माय – माऊल्यानीं बाजूलाच लागून जवळच नैसर्गिक स्रोत असलेल्या पाण्याच्या खड्ड्यातून ….अक्षरशः डोक्यावर ….पाण्याचे हांडे, ड्रम, बरण्या वाहून आणून ह्या इवल्याश्या झाडांना उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी देऊन जगविली आहे ही वनसंपदा !…म्हणूनच आमचा जीव कासावीस व्हायचा हे सर्व असुरी कृत्य पाहिल्यावर.
ह्या करिता दर वर्षी सातत्याने पावसाळा सुरू झाल्यावर त्या झाडांच्या आजूबाजूला गवत वाढल्यावर ते ग्रासकटर मशिन्सच्या माध्यमातून किंवा औषध फवारणी करून त्या आजूबाजूला वाढलेल्या गवताची सफाई केली जातेय. अक्षरशः तेवढ्या मोठ्या परिसरातील गावताची सफाई केली जातेय आणि तेच काम आज गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडे…. आणि … केअर ऑफ नेचर सामजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले. आणि ह्या गवतसफाई कामाकरिता निसर्गप्रेमी श्री.राजू मुंबईकर यांनी स्वतः हजर राहून औषध फवारणी करिता दोन कामगार, दोन हँडपंप, औषध, बॉटल्स स्वतःच्या स्वखर्चातून आणून दिले !….
सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत चाललेल्या ह्या कामात आपला खास सहभाग नोंदविला तो गोल्डन ज्युबली मित्र मंडळाचे उपाध्यक्ष हिराचंद म्हात्रे, कार्याध्यक्ष देविदास पाटील माजी सरपंच, मंडळाचे माजी खजिनदार शशिकांत म्हात्रे, सदस्य अनिल घरत युवा सामजिक कार्यकर्ते संपेश पाटील, सुभाष पाटील, निशिकांत गावंड या सर्वांनी आणि सोबतच …रानसई.. येथून आलेले दोन कामगार दीपक आणि श्याम या सर्व मंडळींनी ह्या वनसंपदेला वाचविण्याच्या मोहिमेत आपलं अनमोल योगदान देत निसर्गाप्रती असणारं आपलं प्रेम आणि निसर्ग संवर्धनाची हाती घेतलेली आपली मोहीम अशीच या पुढेही सुरूच राहील याचं एक आदर्श उदाहरण देतं आपलं कर्तव्य बजावलं !…

– लेखन : अनिल घरत. पिरकोन, उरण (रायगड)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
“”” सारडे गावा शेजारील, निव्वळ रेताड टेकाड असलेल्या ,”” दाता “” डोंगराच्या , ह्या परिसरात आपण , उत्तम वन संपदा जोपासलीत,हे खरोखरच एक कौतुकास्पद काम आहे. सध्या पर्यावरणाचा प्रश्न, जागतिक पातळीवर ऐरणीवर असताना , गोल्डन ज्युबिली मित्र मंडळ , सारडे आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था …ह्या दोन्ही संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी निसर्गाप्रति, केलेल्या ह्या कार्याला मना पासून सलाम. आपणा सर्वांनी, इथली
वन संपदा जोपासण्या साठी जे कष्ट घेतलेत त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद आणि सर्वांचे मनापासून आभार….!!!
केअर ऑफ नेचरचे , सर्वेसर्वा श्री. राजू मुंबईकर सर यांच्या निसर्गावर असलेल्या प्रेमामुळे, नव तरुणांमध्ये सुद्धा , निसर्गाप्रति प्रेम
निर्माण होवून , त्यांच्या मनात, निसर्ग संरक्षण संबंधी , एक प्रकारे सकारात्मक संदेशाचे बीज रोवले जातेय,हे वरील घटने वरून दिसून येत आहे.
पर्यावरण संरक्षण करण्यासाठी ,भविष्यात आपण जे काम कराल त्या साठी सर्वांना मनापासून शुभेच्छा….!!!
👍👍👍
पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभार आणि सर्वांना धन्यवाद…!!!
_________________________________
श्री.अनिल भाई घरत,यांनी केलेले बातमीचे लेखन खूपच छान ..!!!
अनिल भाई, आपण असेच लेखन करत जा.त्यासाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा….!!!
श्री. देवेंद्र भुजबळ यांनी बातमीला योग्य न्याय दिला त्याबद्दल त्यांना खुप खूप धन्यवाद….!!!
🙏🙏🙏
God Bless You All….!!!
🙏🙏🙏