Wednesday, September 17, 2025
Homeबातम्याआकर्षक व्हिस्टाडोम कोच

आकर्षक व्हिस्टाडोम कोच

मध्य रेल्वेवरील व्हिस्टा डोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मुंबई- गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई – पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे टॉप आणि रुंद खिडक्या असलेले हे डबे हिट ठरले आहेत.

मध्य रेल्वेने एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या सहा महिन्यांत 56,895 प्रवाशांची नोंदणी करून रु. 7.32 कोटी महसूल मिळवला आहे. मुंबई – मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस ही 100% पेक्षा जास्त वहिवाट (occupancy) म्हणजे 16,078 प्रवासी संख्येसह सर्वात पुढे असून रु.3.35 कोटी महसूल मिळविला आहे. मुंबई -पुणे- मुंबई डेक्कन क्वीनने अप दिशेने पुणे ते मुंबई दरम्यान रु. 1.43 कोटींच्या महसूलासह 99% वहिवाट (occupancy) नोंदवली आहे. मुंबई- पुणे – मुंबई डेक्कन एक्स्प्रेस ने 100% वहिवाट (occupancy) सह म्हणजेच 16,190 प्रवासीसंख्या आणि रु. 1.26 कोटी महसूल प्राप्त केला आहे.

वर्ष 2018 मध्ये मुंबई- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच पहिल्यांदा मध्य रेल्वेत आले. प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे, मुंबई – मडगाव मार्गावरील दुसरा विस्टाडोम कोच 15.09.2022 पासून तेजस एक्सप्रेसला जोडण्यात आला.

या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये 26.6.2021 पासून सुरू करण्यात आले. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मुंबई-पुणे मार्गावरील आणखी दोन विस्टाडोम डबे डेक्कन क्वीनला दि. 15.8.2021 पासून आणि प्रगती एक्स्प्रेसमध्ये दि. 25.07.2022 पासून जोडण्यात आले. तसेच पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये देखील एक विस्टाडोम कोच दि. 10.08.2022 पासून जोडण्यात आला आहे.

व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट इत्यादी अनेक वैशिष्ट्यांसह आकर्षक व्ह्यूइंग गॅलरी आहे.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं