Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यबळीराजा...

बळीराजा…

सर्व भारतीय शेतकऱ्यांना आजच्या
“२१ व्या शेतकरी दिवसा”च्या हार्दिक शुभेच्छा. त्या निमित्ताने ही विशेष कविता ..
– संपादक

शेतकरी दिनी
दंडवत करुनी
शेतकरी दिवस साजरा करुया
‌बळीराजाचा उत्साह वाढवूया ||१||प

तो करितो मातीची पुजा
नांगर फिरवूनीया
वर्षभर कष्ट करूनी पावसाची आशा करतुया
बळीराजाला आनंदी पाहुया ||२||

पिकवितो मातीतून मोती त्याला फळ देऊया
सर्जा राजाच्या जोडीला
आदर देऊया
बळीराजाला समाधानी पाहुया ||३||

शेतकरी पिकवितो अन्न आपल्याला देतो
माॅल पेक्षा स्वस्त
ताज्या भाजीला मोल वाढवून देऊया
बळीराजाला सन्मान देऊया ||४||

सर्व क्षेत्रात क्रांती घडते शेतकऱ्यांना कमी लेखतया
ज्या अन्नदाता वर जगता
त्याला पेंशन देऊया
बळीराजाला इच्छाधारी बनवूया ||५||

तो तिन्ही ऋतूत
राबतुया दिस रात शेतात
पण न्हाई जमा त्याच्या कुटुंबासाठी हातात
त्यास मानाचे स्थान मिळवून देवूया
बळीराजाची पुढची पिढी घडवूया ||६||

त्याच्यामुळे आपण खातोया तुपाशी
तो नाही जगला तर
आपण राहू उपाशी
जो वर्षभर नियोजन शेतात करतुया
त्याची हि कला
तोच करतुया ‌
बळीराजाला पुरस्काराने गौरुया ||७||

तो करी रक्ताचे पाणी
पण त्याच्या घामाची किंमत करेना कोणी
कर्जबाजारी झाल्यावर
फासावरुन कोणीच उतरवेना
जगाच्या पोंशीदावर कोणीच लक्ष देईना
म्हणून शेतकऱ्याला सहकार्य करुया
बळीराजाला डॉट कॉम मध्ये पाहुया ||८||

विलास देवळेकर

– रचना : विलास देवळेकर. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments