नमस्कार, मंडळी.
आपल्या न्यूज स्टोरी टुडे या आपल्या वेबपोर्टल साठी नवी सदरे सुचवा म्हणून आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादातून या वर्षासाठी पुढील नवीन सदरे सुरू करण्यात येत आहे.
सोमवार :-
“आपलं आयर्वेद”
या विषयावर डॉ स्वाती दगडे यांनी काही भाग लिहिले आहेत. या पुढील भाग वैद्य शार्दुल चव्हाण, एम.डी(आयुर्वेद) हे लिहिणार आहेत.
मंगळवार :-
“मी वाचलेले पुस्तक”
या सदरात निवृत्त माहिती संचालक तथा गाढे वाचक, समीक्षक, श्री सुधाकर तोरणे हे त्यांनी वाचलेल्या पुस्तकाविषयी लिहिणार आहेत.
गुरुवार :-
“अवती भवती”
स्टेट बँकेचे निवृत्त व्यवस्थापक तथा जेष्ठ लेखक, समीक्षक श्री प्रकाश चांदे हे या विषयावर लिहिणार आहेत.
शुक्रवार :-
“सहज सुचलं म्हणून”
या सदरासाठी दिल्ली येथील लेखिका क्षमा प्रफुल्ल या त्यांना सुचलेल्या, भावलेल्या विषयावर सध्या सोप्या शैलीत भाष्य करणार आहेत.
या शिवाय दर बुधवार चे आठवणीतील गाणी,
(श्री विकास भावे), शनिवारचे “राग सुरभी” (प्रिया मोडक) “चित्र सफर”, यश कथा,”हलकं फुलकं”, “पुस्तक परिचय”, “पर्यटन”, “कविता”, प्रासंगिक लेख, बातम्या, वाचक लिहितात.. प्रसिध्द होत रहाणार आहेच.
गेल्या वर्ष भरात यशस्वी पणे सदरे लिहिणाऱ्या
-प्रा डॉ किरण ठाकूर, पुणे (बातमीदारी करताना)
-डॉ गौरी जोशी कंसारा, न्यू जर्सी, अमेरिका, (मनातील कविता)
– प्रा विसुभाऊ बापट, मुंबई (कुटूंब रंगलंय काव्यात)
– प्रा डॉ विजया राऊत, नागपूर (महानुभावांचे योगदान)
– सौ वर्षा महेंद्र भाबल, नवी मुंबई (जीवन प्रवास)
– निवृत्त पोलिस उपअधीक्षक, सौ सुनीता नाशिककर, मुंबई (आणि मी पोलिस अधिकारी झाले)
– सौ रश्मी हेडे. यशकथा, कविता
या सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन व आभार.
उपरोक्त सदरांपैकी “जीवन प्रवास” हे सदर पुस्तक रुपात प्रसिध्द झाले असून त्याला छान प्रतिसाद मिळत आहे. तर “आणि मी पोलिस अधिकारी झाले”, “समाजभूषण २” ही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
या सदरांच्या निमित्ताने न्यूज स्टोरी टुडे ने प्रकाशन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे, हे एक मोठेच यश आहे.
आपण सर्व लेखक, कवी,वाचक, हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे आपल्या वेबपोर्टल ला उत्कृष्ट वेबपोर्टल म्हणून “चौथा स्तंभ” हा पत्रकारितेतील अत्यंत सन्मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
मा. मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते येत्या पत्रकार दिनी, ६ जानेवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्याचे सविस्तर वृत्त, आमंत्रण देत आहोतच.
आपला लोभ वृध्दींगत व्हावा, अशी विनंती आहे.
आपली
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन !
न्यूज स्टोरी टुडे वेब पोर्टलने प्रकाशन क्षेत्रात पहिले पाऊल टाकले नि यशाच्या कळसावर दिसू लागले.
अश्या कामगिरीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
संपादक श्री.देवेंद्र सर, प्रकाशिका सौ.अलका मॅडम नि आपले न्यूज स्टोरी टुडे वेब पोर्टल,
तसेच लेखक, कवी सर्वांचे खूप खूप अभिनंदन !
सौ.वर्षा महेंद्र भाबल.