विकास पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल अप्रतिम मीडिया या संस्थेमार्फत गेली १० वर्षे ‘चौथा स्तंभ’ हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.विशेष म्हणजे हे सर्व पुरस्कार जनमत चाचणी घेण्यात येऊन त्या आधारे दिले जातात.
सामाजिक संदेश या वर्ग वारीतील पुरस्कार आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टलला जाहीर झाला आहे.
हे पुरस्कार येत्या पत्रकार दिनी म्हणजेच शुक्रवार, ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मा.मुख्यमंत्री, मा.उप मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहेत. पुढे निमंत्रण देत आहे. तरी आपण सर्वांनी या वेळी अवश्य उपस्थित रहावे, ही आग्रहाची विनंती.
न्यूज स्टोरी टुडे
आफ्टरनून, फ्री प्रेस जर्नल, डी एन ए (झी मीडिया), एशिएन एज (डेक्कन क्रोनिकल) या मुंबईतील प्रतिष्ठित इंग्रजी वर्तमान पत्रांमध्ये व काही काळ टिव्ही 9 आदी ठिकाणी पत्रकार, सिनिअर कोरोस्पॉडंट म्हणून आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटवलेल्या देवश्री
भुजबळ यांनी कोरोनाच्या भयंकर काळात लोकांना धीर मिळावा, दिलासा मिळावा, योग्य माहिती मिळावी या साठी काळाची पावले व डिजिटल पत्रकारितेचे महत्व ओळखून न्यूज स्टोरी टुडे हे वेबपोर्टल सुरू केले. यासाठी तिने या माध्यमाचे स्वतः प्रशिक्षण घेतले.
गेल्या दोन वर्षांत या वेबपोर्टलची लोकप्रियता सारखी वाढतच आहे. सध्या हे पोर्टल ८६ देशात पोहोचले असून ४ लाख ७६ हजाराहून अधिक याचे व्ह्युज आहेत. राजकारण, गुन्हेगारी, समाजातील भानगडी, चारित्र्य हनन असा काही मजकूर न देता विश्व बंधूत्व, देशप्रेम, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, आरोग्य, नवे विचार, समाजकल्याण, क्रीडा, पर्यटन, यश कथा असाच मजकूर या पोर्टल वर असतो. त्यामुळे विशिष्ट अभिरुची, आवड असणारे देश विदेशातील लेखक, कवी, वाचक, विविध क्षेत्रातील व्यक्ती या वेबपोर्टलशी जोडल्या गेले आहेत आणि जोडले जात आहेत.
निवृत्त माहिती संचालक तथा माजी दूरदर्शन निर्माते देवेंद्र भुजबळ हे या वेबपोर्टलचे संपादन तर त्यांच्या सहचारिणी सौ अलका भुजबळ या वेबपोर्टलची निर्मिती करीत असतात.
पत्रकारितेतील अत्यंत मानाचा असलेला “चौथा स्तंभ” हा या वेबपोर्टलला मिळालेला पुरस्कार म्हणजे सर्व लेखक, कवी, विविध कारणांनी वेबपोर्टल शी जोडल्या गेलेल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे जणू प्रतीकच आहे.
– टीम एनएसटी. 9869484800
भुजबळ कुटुंबियांचे सहृदय हार्दिक अभिनंदन.
एक आगळे वेगळे, नवीन लेखकांना प्रोत्साहन देणारे तांत्रिक दृष्ट्या प्रगत माध्यम उपलब्ध करून दिल्या बाबत, आभार.
न्यूज स्टोरी वेब l पोर्टलला मिळाला पुरस्कार त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन… आपण समाजप्रबोधनाचे फार महत्त्वाचे काम करीत आहात याच्या आम्हाला फार मोठा अभिमान वाटतो आहे. या कामी आपल्या मॅडमचे देखील फार मोठी योगदान आपणास मिळत आहे. पुनश्च एकदा मनःपूर्वक अभिनंदन…
Great news dear Sir, Congratulations





अभिनंदन !
न्यूज स्टोरी टुडे वेब पोर्टल संपादक श्री.देवेंद्र भुजबळ सर निर्मात्या व प्रकाशिका सौ. अलका भुजबळ मॅडम, मनःपूर्वक अभिनंदन !
सौ.वर्षा महेंद्र भाबल.
HEARTLY CONGRATULATION SII AND MADAM