आज पासून मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. त्या निमित्ताने या महिन्याचे महत्व सांगणारे गीत पुढे देत आहे.
‘रमजान’च्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
सगळ्या महिन्यात “रमजान”ची शान
इस्लामचा पवित्र महिना “रमजान“….॥धृ॥
अल्लाह कडून मिळते बक्षिस छान
रोजा मुळे होते भूख तहानेची जाण
या महिन्यात उतरला पवित्र “कुराण”
इस्लामचा पवित्र महिना “रमजान”…..॥१॥
सत्य, अहिंसा व शिक्षणाचे आचरण
“मोहम्मद पैगंबरांची”ही शिकवण
इबादत बरकतीचा महिना महान
इस्लामचा पवित्र महिना “रमजान”…….॥२॥
सदका, फितरा, जकात देवून दान
गोरगरिब निराधारांना याचा मान
सहेरी पासुन करी अल्लाहचे गान
इस्लामचा पवित्र महिना” रमजान”…..॥३॥
नवे कपडे, डोळ्यात शुरमा, अत्तर
गोड खाऊन निघती “ईदगाहवर”
मुलांना “ईदी”, गळाभेट, आलिंगन
इस्लामचा पवित्र महिना “रमजान” …..॥४॥
रोजदारास वाटतात पकवान
इफ्तेयारित खजूरालाच असे मान
शिरर्खुमा देतात वैर विसरून
इस्लामचा पवित्र महिना “रमजान”…….!!५!!
काही शब्दांचा अर्थ-
सदका : काही अघटीत होवू नये किंवा कोणी एखाद्या संकटातून सही सलामत येतो तेव्हा त्याच्या नावाने गरिबाला किंवा फकिराला काही रक्कम किंवा धान्य दिले जाते
फितरा : मुस्लिम धर्मा मध्ये निराधार व्यक्तिला
अडिच किलो धान्य किंवा पैशाच्या रुपात मदत केली जाते. मदत करणारे लोक सहसा ती रमजान मध्येच देतात
जकात : आपल्या मालमत्तेच्या २.५% इतकी रक्कम गरजू, निराधार, जवळील नातेवाईक (बहिन भाऊ सुध्दा) जे खरंच गरजवंत आहे, त्यांना देतात. (त्यात स्त्रियांच्या दागिण्यांचा देखील समावेश असतो. साडेसात तोळ्या पेक्षा जास्त सोने व ५२ तोळे किंवा जास्त चांदी असेल तर त्याची जकात द्यावी लागते.)
सदका, फितरा, जकात हे जे जे द्यायचे ते ईदच्या नमाजच्या अगोदर द्यायचे असते. जेणेकरून करुन प्रत्येक गरिब देखील आनंदाने ईद साजरी करु शकेल
ईदी : ईदच्या दिवशी लहान मुले मोठ्यांना सलाम करून गळाभेट घेतात. छोट्या बच्यांना खुश होउन भेट दिली जाते. त्याला ईदी म्हणतात.

– रचना : अनिसा सिकंदर शेख. दौंड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800