उठ उठ शाळा सुरू झाली
तुझी मैत्रीण शाळेत चालली
चलचल तयारी तुझी झाली
पुढे चालत रहा, मी मागे आली
थांब तुझी पोळी भाजी राहिली
आईंच्या विचारात काहूरं भरली
माझी शाळा आई फुलांनी रंगली
म्हणून माझी शाळा बाई चांगली
प्रार्थना सुरात मैदानावर झाली
वर्गात शिस्तीने, रांगेत बसली
नवी पुस्तके, मैत्रीत मग्न झाली
तेवढ्यात आई केंव्हा घरी गेली
पहिला तास मराठीचा झाला
आईचा कर्माचा धडा समजला.
— रचना : गोविंद पाटील. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
