नवा सूर्य, नवी आशा
उजळून गेल्या
दाही दिशा
नवी ध्येय, नवी स्वप्न
नव्याने पुन्हा
करू प्रयत्न.
खडतर रस्ता, काट्याकुट्यांची वाट
हाच खरा जीवनप्रवास
मनात असेल जर आत्मविश्वास
तर यश ही मिळेल हमखास.
आज चुकलो, पडलो, हारलो
निराश मुळीच नाही होणार
नवा मार्ग, नवी वाट
संकटांवर हिंमतीने करणार मात.
नवे संकल्प नवी कल्पना
सातत्याने पूर्ण होतील मनोकामना
नवी जिद्द, नव्हे आव्हान
साध्य करताच
मिळेल समाधान.
स्पर्धा माझी माझ्याशीच
काल पेक्षा आज उत्तम करण्याची
रोज काहीतरी नवीन
स्वतःलाच सुधारण्याची.
आज आहे उद्या नसणार
कार्यरूपी मनात
घर करणार
आज आहे
उद्या नसणार
कार्यरूपी मनात
घर करणार.

— रचना : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.