मागच्या भागात आपण स्टॉकहोम थोड फिरलो. (पुढच्या काही भागात अजून थोड फिरायचे आहे 😃) क्रुज ने Estonia chi राजधानी Tallinn येथे जाण्यासाठी 16 ला निघालो. शुक्रवार (वीकएंड) असल्याने खूप गर्दी होती. आम्ही पटकन आम्हाला दिलेल्या रूम मध्ये सामान ठेवून डेक वर जायचे ठरवले. आणि क्रुज अन्वेषण (explore) करायचे ठरवले.
Deck वर म्युझिक लावलेले होते. बहुतेक सर्व जण वर च्या restaurant मध्ये बसून निवांत ड्रिंक घेत नाचत मोकळ्या हवेचा आनंद घेत होते. ईथे वेगवेगळ्या वांशिकता/ethnicity (European, African, Arebic, Chinese, Japanese आणि अर्थात भारतीय 😃) लोक होते. भारतीय लोक पण सगळीकडे हिंडत असतात. 😃
सर्वात वर च्या डेक वर गेलो. तिथून स्टॉकहोम दिसत होते. चिराग आम्हाला कोणत्या बिल्डिंग दिसताहेत ते सांगत होता. जसे मी मागच्या लेखात सांगितले की स्टॉकहोम हे 30 हजार द्विपसमूहाने बनलेले शहर आहे. त्यामुळे पुढे बराच वेळ (4 ते 5 तास) आम्हाला भरपूर छोटी छोटी बेटे दिसत होती. ह्यातल्या शहराजवळील बेटांवर वस्ती दिसत होती. काही लोकांनी अश्या बेटांवर वीकएंड होम्स पण बनवली आहेत. मात्र जस जसे पुढे खोल समुद्रात शिप जायला लागलं तशी वस्ती कमी होत गेली असे दिसले.
ह्या क्रुज वर पहिले 5 मजले रूम्स आहेत. क्रुज एन्ट्री 5 व्या मजल्यावर होते आणि आधी बूक केल्याने लेकाला चॉईस मिळाली होती व त्याने 5 व्या मजल्यावरच रूम बूक केली होती. त्याचा फायदा आम्हाला असा झाला की सामान घेऊन आम्हाला शिप वर जास्त चढ उतर करावी लागली नाही. 6 व्या मजल्यावर सुपर मार्केट व restuarants व side ला seating areas होते जिथे काचेतून बाहेरचा नजरा दिसतो. 7 व्या मजल्यावर discotheque व लहान मुलांना खेळायला गेम झोन आणि video गेम्स असे करमणुकीचे पर्याय होते. 8 व्या मजल्यावर restuarant व deck आणि 9 व्या मजल्यावर ओपन deck असे होते.
क्रुजने जायची कल्पना व एक सुखद आश्चर्याचा धक्का लेकानं दिल्यामुळे प्रशांत ते फार relax होवून सर्व एन्जॉय करत होता. आणि ते बघून मला पण फार छान वाटले. पहिल्यांदा मी त्याला एवढ relax पाहिले. इथून मागच्या आमच्या सर्व राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सहली ह्या त्यानी नियोजन केले आहे. पण ह्या वेळी ते नियोजन व त्याच execution सर्व लेक बघत असल्यामुळे प्रशांत relax असावा. 😇
बराच वेळ सगळया मजल्यांवर वर भटकून झाल्यावर तिथल्या सुपर मार्केट मधून खायला विकत घेऊन रूम मध्ये येऊन खायचे ठरवले. Restuarant मध्ये खूप गर्दी असल्याने आम्ही असा निर्णय घेतला. शिवाय रूम मध्ये आम्हाला शांत बसून मस्त गप्पा मारत कौटुंबिक वेळ घालवत खायला/प्यायला 😅 मिळाले. शिवाय रूम sea facing खिडकी असलेली होती. त्यामुळे बाहेरचा नजारा हि दिसत होता.
रात्री मुलं discotheque मध्ये जावुन आली. मी आणि प्रशांत रूम मध्ये एक movie बघत बसलो. 1.30 /2 च्या आसपास सगळे झोपलो. कारण तोपर्यंत खूप आवाज येत होता. पार्टी पब्लिक जास्त होते. क्रुज 17 तारखेला सकाळी 10.30 ला Tallinn ला पोहोचली. आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी 5.30 ला निघालो होतो. म्हणजे आम्हाला क्रुज ने 17 तास लागले.
हा सर्व मार्ग baltic समुद्रातून आहे. आपण जर जगाच्या नकाशावर बघितले तर स्टॉकहोम, Tallinn (Estonia) व Helsinki (Finland) ह्यांचे भौगोलिक स्थान लक्षात येईल. त्याच समुद्रातून पुढे अजून 100/200 km वर रशियाच St Petesberg येत. त्यामुळे चिराग गमतीत म्हणाला चला जायच का रशिया ला ? 😃 Visit mother Russia before mother Russia visits you हे मीम आठवले 😅
Estonia हा देश 20 ऑगस्ट 1991 रोजी स्वतंत्र झाला. त्या आधी तो रशिया च्या सोविएत संघाचे एक प्रजासत्ताक होता. त्यामुळे तिथे रशियन प्रभाव खूप जाणवतो. बाकी European देशात Christianity चा catholic हा पंथ लोकांनी अंगीकारला आहे. तर रशियन लोकांनी प्रोटेस्टंट पंथ अंगीकारला आहे. त्याचा प्रभाव Estonia मध्ये आहे. चर्च च्या कळसाच्या बांधणीत तो फरक कळतो. स्विडीश व इस्टोनियन लोक जरा भिडस्त असली तरी आपण बोलल्या वर चांगला प्रतिसाद देतात असा अनुभव आला.
Tallinn हे फार मोठे शहर नाही. सगळीकडे चालत हिंडू शकतो. आम्हाला आमचे Airbnb अपार्टमेंट दुपारी एक वाजता मिळणार होते. म्हणुन आम्ही आरामात चालत शहर बघत एक च्या सुमारास अपार्टमेंट ला जायचे ठरवले. सी पोर्ट पासून तसे अपार्टमेंट लांब नव्हते पण मग मुद्दाम फिरून गेलो.
रस्त्यावर कुठे हि गर्दी नव्हती. आरामात चालत जाता आलं. इथे रस्ता क्रॉस करण्यासाठी सिग्नल च्या खांबाला स्विच दिलेले आहेत. ते प्रेस केले की जरा वेळात क्रॉस करण्यासाठी सिग्नल मिळतो. हे मला भारी आवडले 😁 मात्र सर्व जण रस्ता झेब्रा क्रॉसिंग लाच क्रॉस करतात. असे आपल्याकडे पण व्हायला पाहिजे असे मनापासून वाटले.
आम्ही आधी तिथल्या बिझनेस डिस्ट्रिक्ट मध्ये गेलो. तिथे खूप सार्या कंपनी चे ऑफिसेस आहेत. तो परिसर कॅफे व वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सच्या दुकानांनी गजबजलेला आहे. तिथे एक छोटे पुस्तक दुकान बघितले जे पूर्ण काचेचे बनवले आहे. त्यातही शोभेच्या फुलांच्या कुंड्या व वेल फार कलात्मक पद्धतीने ठेवलेले होते. म्हणजे कोणी पुस्तक वाचायला बसले तरी त्याला प्रसन्न वाटेल असे वातावरण निर्माण केले आहे. त्याच्या आसपास हिरवळ, झाडे, कारंजे व एक चित्रपट गृह आहे. हिरवळीवर वेगळ्या स्टाइल च्या खुर्च्या, झाडा शेजारी बसायला कट्टे आहेत. काही मुले तिथे स्केटिंग करत होती. तर काही जण सायकल चालवत होते. तिथे आजूबाजूला बघण्यात जरा वेळ घालवला आणि मग पुढे विरू keskus मॉल मध्ये गेलो. तिथे जरा वेळ भटकून मग आमच्या Airbnb अपार्टमेंट कडे निघालो. सध्या तिथे काही ठिकाणी रस्त्याची कामे चालू आहेत म्हणून जरा धूळ होती. पण चिराग ला रस्ते माहित असल्याने आम्हाला अपार्टमेंट शोधायला वेळ लागला नाही. इथे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा झाल्या आहेत व होत हि आहेत. पण त्यांनी त्यांच वेगळे पण तिथल्या संग्रहालयाच्या माध्यमातून जपलय.
ज्याचे अपार्टमेंट आहे तो माणूस त्याच बिल्डिंग मध्ये खाली असणार्या एका restuarant मध्ये काम करतो. त्यामुळे आम्ही फोन केल्यावर तो लगेच आला व आम्हाला अपार्टमेंट पर्यंत घेऊन गेला. तिथले सर्व दाखवून घराची चावी देवून गेला. हे अपार्टमेंट 1BHK होते. आम्ही फ्रेश होऊन बरोबर पॅक करून आणलेले अन्न खाल्ल आणि kadriorg पार्क ला जायला निघालो. त्यासाठी मात्र ट्राम घेतली. चिराग ने पोर्ट वर उतरल्या वर लगेच चौघांसाठी लोकल ट्रान्सपोर्ट कार्ड घेतले होते.
हा खूप छान बगीचा आहे. 70 हेक्टर जागेवर पसरलेला आहे. ईथे आजूबाजूला भरपूर झाडे, फुलझाडे, हिरवळ, कारंजी अस सर्व व्यवस्थित मेंटेन केलय. भरपूर मोठा परिसर आहे. इथे आतमध्ये एक संग्रहालय आणि एक राजवाडा आहे. तिथे सध्याचे त्यांचे प्रेसिडेंट राहतात. त्यामुळे तिथे security असते व तिकडे जाऊ देत नाहीत. राजवाडा संग्रहालयाच्या जरा पुढे आहे. संग्रहालयाच्या समोरून एक रस्ता समुद्राच्या दिशेने जातो जिथे एक russalka मेमोरियल नावाच पितळी sculpture आहे जे एका Estonian sculpturer नी बनवले आहे. हे एक रशियन warship होते जे Finland च्या दिशेने जाताना 1893 मध्ये समुद्रात बुडाले होते, त्या स्मरणार्थ बनवले आहे.
संग्रहालय व राजवाडा ह्या मध्ये पण खूप छान बगीचा आहे. संग्रहालयात तिथल्या सांस्कृतिक वस्तू (आधी च्या वापरातील क्लासिक वस्तू, चित्रे/पेंटिंग इत्यादी ) फार छान पद्धतीने मांडलेल्या आहेत. हे संग्रहालय दोन मजली आहे. (ग्राउंड, पहिला व दुसरा मजला)
गार्डन व संग्रहालयात बराच वेळ घालवल्यावर आम्ही ट्राम नी tallinn वॉल कडे गेलो. ह्या पूर्ण परिसरात खूप पर्यटक असतात. तिथे गेल्यागेल्या समोरच एका बाजूला खूप सारी फुलांची व पुष्पगुच्छ बनवुन देणार्या दुकानांची रांगच आहे. व रस्त्याच्या दुसर्या बाजूला कॅफे आहेत. इथल्या एका कॅफेत थोडे खाऊन कॉफी घेतली. थोडे पुढे गेल की बुरुजा सारखी बांधलेली भिंत दिसते. इथे वर चढून चालता येत पण आम्हाला पोहोचायला जरा उशीर झाला. त्यामुळे त्याचा दरवाजा बंद झाला होता. इकडे परत दुसर्या दिवशी यायचे आम्ही ठरवले. आपल्याकडे शनिवार वाड्याच्या भिंतीवरून कस चालत हिंडता येत तशी पण सुस्थितीत व सुशोभित असलेली हि भिंत आहे.
आम्ही पुढे tallinn city square च्या दिशेने गेलो. त्या ओल्ड टाऊन रस्त्यावर vehicular ट्रॅफिक तशी कमी होती.. बहुतेक ठराविक रस्त्यांवर त्याची परवानगी असावी. छोट्या रस्त्यांच्या कडेला ठिकठिकाणी कॅफे आणि restuarant आहेत. तसेच सुशोभीकरणासाठी फुलांच्या कुंड्या देखील आहेत. ह्या भागात त्यांच्या तिथल्या traditional डिशेस serve करणारे restaurants आहेत. त्यांचा ambience पण त्या प्रमाणे तिथल्या संस्कृती ला अनुसरून आहे. हे सर्व निरीक्षण करत आम्ही पुढे चालत राहिलो. एक संगीत विद्यालय व चर्च च्या मधल्या रस्त्याने आम्ही Tallinn city square La पोहोचलो. हि जागा मध्ये मोकळी, एका बाजूला चर्च व बाकी तिन्ही बाजूंनी कॅफे, restuarant आहेत. इथेच एक इंडियन रेस्तराँ पण आहे.
मधल्या मोकळ्या जागेत खूप कलात्मक पद्धतीने षटकोणी आकारात लाकडी बेंचेस बनवले आहेत. ते पण खूप सारे षटकोण एकमेकांना जोडून छान डिझाईन बनवली आहे. बेंचेस मधल्या रिकाम्या जागेत शोभेची फुलझाडे आहेत तसेच आजूबाजूला पण शोभेच्या झाडांच्या कुंड्या आहेत. खूप सारे पर्यटक तिथे बसून गप्पा मारत आइस क्रीम किंवा अन्य पेयांचा आस्वाद घेतात.
ह्या जागेच्या आजूबाजूला छोट्या छोट्या गल्ली आहेत. अश्या एका गल्लीतून जी चर्च च्या बाजूने थोडी चढण घेत जाते, तिथे पुढे साधारण पणे 600/700 मिटर वर एक view पॉईंट आहे जिथून Tallinn शहराचा फार छान नजरा दिसतो.
चर्च समोर एक जण पूर्ण चेहर्यावर मास्क लावून बुद्धिबळाचा डाव मांडून बसला होता. बरेच जण तिथे जावून त्याच्या बरोबर खेळत होते पण नेहमी तो जिंकायचा. चिराग ने पण त्याच्या बरोबर बुद्धिबळ खेळून बघितले 😃. बराच वेळ इकडे तिकडे हिंडून झाल्यावर आम्ही तिथल्या एका traditional डिशेस serve करणार्या restuarant मध्ये जेवायला गेलो. रात्री चे 9 वाजले तरी छान उजेड होता. तिथे मातीच्या मोठ्या मग मध्ये पेय serve करतात. तिथले जेवण मस्त एन्जॉय केले आणि मग अपार्टमेंट मधे गेलो.
दुसर्या दिवशी 18 तारखेला आवरून नाश्ता झाल्यावर तिथल्या प्रसिद्ध विरू हॉटेल मध्ये KGB (रशियन सीक्रेट agency) विषयी एक माहितीपट दाखवतात, तो बघायचा ठरवलं. हे हॉटेल तिथे फार प्रसिद्ध आहे. जगभरातील प्रसिद्ध लोक (खेळाडू किंवा नेते वैगरे) Tallinn मध्ये आल्यावर तिथे राहतात असे समजले. तिथे इंग्लिश माहितीपट फक्त सकाळी 10 ते 11 ह्या वेळात दाखवतात. पण तिथे पोहोचायला उशीर झाल्याने तो मिस झाला. बाकी वेळी तिथल्या लोकल भाषेत Estonian मध्ये तो असतो.
हॉटेल पासून Tallinn wall जवळच आहे. आदल्या दिवशी ते मिस झाले म्हणुन मग तिथे गेलो. तिथे भटकंती करून फोटो काढून 😃 परत अपार्टमेंट मधे आलो. एक वाजता आम्हाला ते सोडायचे होते. त्या प्रमाणे पॅकिंग आधी करून ठेवले. फ्रेश होऊन परत एकदा काही विसरले नाही ना ?त्याची खात्री करून Christo ला (अपार्टमेंट मालक जो खालच्या restuarant मध्ये काम करतो) बोलवले. चावी त्याच्या कडे सुपूर्त करून खालच्या रेस्तराँ मध्ये Pizza खाल्ला आणि सामान घेऊन चालत पोर्ट कडे गेलो. आम्हाला तिथे चार वाजता पोहोचायचे होते. आम्ही आरामात 3.30 /3.45 पर्यंत पोहोचलो.
Helsinki (finland) साठी च्या क्रुज च चेक इन करुन बोर्डिंग केल. Tallinn ते Helsinki क्रुज नी फक्त 2 तासच लागतात. त्यामुळे ह्या शिप वर फक्त रेस्तराँ, लहान मुलांना खेळायला जागा, video games साठी जागा अस आहे. तुम्हाला जागा मिळेल तसे बसुन तुम्ही प्रवासाचा आनंद घेऊ शकता. त्यासाठी भरपूर जागा आहे.. शिवाय decks पण आहेत. ह्या क्रुज वर जास्त कौटुंबिक लोक होती. स्टॉकहोम ते Tallinn च्या क्रुज प्रमाणे वीकएंड पार्टी वाले लोक नव्हते. त्यामुळे मोठ्याने म्युझिक नव्हते . हा फरक लगेच जाणवला. अर्थात आम्ही दोन्ही क्रुज एन्जॉय केले.
4.30 ला क्रुज Tallinn हून निघून संध्याकाळी 6.30 ला Helsinki ला पोहोचले. पोर्ट च्या बाहेर येऊन आम्ही आधी लोकल ट्रान्सपोर्ट कार्ड घेऊन बस नी Helsinki सेंट्रल ला जावून तिथल्या एका दुकानातून आमच्या Airbnb अपार्टमेंट ची चावी घेऊन ट्राम नी अपार्टमेंट कडे गेलो.
हे अपार्टमेंट 2bhk चे होते. हॉल ला मस्त गॅलरी होती. फार छान व सर्व सोयींनी मेंटेन केलेले होते. अगदी Sauna पण होत तिथे. Europe मध्ये सगळीकडे bio waste, प्लास्टिक कचरा, मेटल कचरा इत्यादी साठी वेगवेगळ्या dustbin असतात. आणि कचरा त्या त्या कचरापेटीत टाकून स्वतः बिल्डिंग जवळ च्या मोठ्या कचरापेटीत जावून टाकावा लागतो.
चिराग ने ईश्वरी ला बरोबर घेऊन जवळच्या supermarket मधून आमच्या साठी रात्री च्या जेवणासाठी नूडल, ज्यूस आणि सकाळच्या नाश्त्याला ब्रेड, अंडी, दही घेऊन आला. तोपर्यंत मी आणि प्रशांत गॅलरीतल्या खुर्च्यांवर बसून मस्त गप्पा मारत चहा घेतला. जेवण झाल्यावर प्रशांत, चिराग ने सर्व कचरा लागलीच खालच्या कचरापेटीत टाकला.
तिथे जवळच एक बगीचा होता जो सामान घेऊन येताना आम्ही बघितला होता. तिथे दोघेही चालून आले. खूप लोक त्यांच्या पेट डॉग ला घेवून त्या बगीच्यामध्ये चालायला येतात. ते आम्ही गॅलरी तून चहा पिताना बघितल होत. मी आणि ईश्वरी नी तोपर्यंत जेवणाची भांडी घासून ठेवली. तिथे आम्हाला 19 चा पूर्ण दिवस व 20 तारखेचा अर्धा दिवस मिळणार होता. हॉल मध्ये थोडा वेळ गप्पा मारत Helsinki मध्ये काय काय बघायचं ते ठरवले आणि मस्त ताणून दिली. 😁
ह्या पुढील भागात Helsinki मध्ये काय काय पाहिले ते तुम्हाला वर्णनातून दाखवायचा प्रयत्न करेन. Tallinn ची सफर कशी वाटली? नक्की कळवा. 😊
— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मस्तच वर्णन केलंस सुप्रिया 👌👌👌 फोटो ही छान आहेत. तुझ्या या लेख मालेमुळे आमचीही उत्सुकता वाढली आहे हे सगळे देश पाहण्याची.
मस्तच वर्णन केलंस सुप्रिया 👌👌👌 फोटो ही छान आहेत.
परदेश वारीचे विहंगम चित्रण.