नवी मुंबईतील सानपाडा येथील मिलेनियम टॉवर्स मध्ये मयुरेश हॉस्पिटल, तुर्भे आणि साई दृष्टी आय केअर हॉस्पिटल, सानपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने, लॉयंस क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्सच्या वतीने नुकतेच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचा लाभ रहिवासी तसेच विशेष म्हणजे घरकाम करणाऱ्या महिला, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, मिलेनियम टॉवर्सच्या सोसायटी मधील कर्मचाऱ्यांनी घेतला.
घरकाम करणाऱ्या महिला, सफाई कामगार, सेक्युरिटी गार्ड्स यांना कामाच्या व्यापातून स्वतः कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाहीं या हेतूने, हे आरोग्य शिबिर लॉयन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियनच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. वजन, मधुमेह तपासणी, डॉक्टरचा सल्ला, इसिजी, डोळ्यांची तपासणी या सर्व सुविधा शिबीरामध्ये उपलब्ध होत्या. मिलेनियम टॉवर्स च्या सह्याद्री सोसायटी ने या आरोग्य शिबिरासाठी जागा उपलब्ध करुन दिली. जनजागृतीसाठी मोठ्या टॉवर्स मध्ये असे शिबिर निदान दर सहा महिन्यांत व्हायला हवे अशी सूचनाही सर्व रहिवासीयांनी केली.

या शिबिरात एकूण १०५ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात २४ जणांचे इसिजी काढण्यात आले. त्यापैकी ८ जणांना अधिक तपासणीसाठी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच डोळ्यांची ही तपासणी करण्यात आली, ज्यांना गरज आहे, अशांना त्वरित डोळ्याचे ड्रॉप्स आणि चष्मा देण्यात आले.
लॉयंस क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्सच्या क्लब च्या अध्यक्षा सौ अलका भुजबळ यांनी शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच सर्व रहिवासीयांचे आभार मानले.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800