१. नंदन
देवकीचा नंदन.
यशोदेचे हेलावले
मन, पाणावले
लोचन.
ममतेचा फुटला
ग पान्हा
गोजिरवाणा
नन्हा कान्हा.
कान्ह्याचे ते रूप
सान,
देवकीची ती कुस
महान.
कृष्णजन्म दैवी
दान.
लाडक्या कान्ह्याचे
कौतुक यशोदेचे
लाडके
पालन पालन.
गोकुळाचे झाले
नंदनवन.
सुदाम्याचे दहिपोहे,
घट्ट नाते जन्माचे.
कृष्णलीला
अन्
गोपगोपिंचे
अनोखे दृश्य
रासक्रिडेचे.
नादमधुर वेणूने
मंत्रमुग्ध वेड
राधेचे.
गोकुळावर रंग
चढले
निर्व्याज गाढ
प्रेमाचे.
कालियाचे
करुनी मर्दन
आनंदले वृंदावनी
जन.
उचलला अंगुलीवर.
गोवर्धन
रक्षिले साहसे
गोकुळजन.
कथूनी गीता
पार्थाला
तत्वज्ञान शिकविले,
जगाला.
आंतरिक,
अध्यात्माचे ज्ञान,
मोक्ष मुक्तीचे
मार्गदर्शन.

— रचना : मीरा जोशी

२. कृष्ण सखा
जन्म बंदी वासातच
यमुनेने दिली वाट
सुखरूप नंदाघरी
यशोदा माया अटूट
खोड्या करितसे रोज
गोपांसवे लोणी चोरी
गोधन आवडे त्यासी
बासरीची धून भारी
सुदामा प्रेम अगाध
गोपी दंग बासरीत
गोवर्धन उचलोनी
रक्षण जनां करीत
पुतनेला ठार मारी
कंस वध करीतसे
जरासंध यमा घरी
तारल्या हजार नारी
पांडवांचा मित्र असे
द्रौपदीची लाज राखी
कौरवांचा नाश करी
राधा त्याची प्रिय सखी
गीतेचे ज्ञान जनास
उद्धरी सर्व जगास
जन्मोत्सव साजरा
पार नाही उत्साहास

— रचना : डॉ.सौ.अनुपमा पाटील. ठाणे
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800