नाशिक येथील शुक्ल यजुर्वेदीय माध्यनदीन ब्राह्मण संस्थेचे, यजुर्वेद मंदिरातील, कै सौ बिंदू रामराव देशमुख सभागृहात ऋषीपंचमीनिमित्त ऋषीपूजन करून, आदर्श व्यक्तिमत्वांचा दीपस्तंभ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
ऋषी पुजन –
महंत रामकिशोरदास शास्त्री, अखिल भारतीय श्रीपंच दिगंबर अनिआखाडा प्रमुख यांचे ऋषीपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे हे १७ वे वर्ष आहे. तसेंच प्रमुख पाहुण्यांसह २१ आदर्श व्यक्तिमत्वांचा दीपस्तंभ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक वाचनालय, नाशिकचे अध्यक्ष प्रा. दिलीप बाळकृष्ण फडके, उद्योजक सौ. शरयू दत्तात्रय देशमुख हे होते. त्यांचेसह अध्यक्ष सतीश शुक्ल, कार्याध्यक्ष तुषार जोशी, कार्यवाह ऍड भानुदास शौचे, उपाध्यक्ष अनिल देशपांडे, कोषाध्यक्ष चंद्रकांत महाजन, गणेशोत्सव समिती प्रमुख अवधूत कुलकर्णी व्यासपीठावर होते.
सुरवातीला कार्याध्यक्ष तुषार जोशी यांनी सर्वांचे स्वागत केले. मान्यवरांचे हस्ते मंत्रघोषात दीपप्रज्वलन व महर्षी याज्ञवल्क्य यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. सतीश शुक्ल, पं वैभव दीक्षित, पं रवींद्र देव, पं उपेंद्र देव, यांनी मंत्रघोष केला.
यावेळी दिवंगत आदर्श व्यक्तिमत्वाच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्याचे निवेदन उपेंद्र शुक्ल यांनी केले. दिवंगत आदर्श व्यक्तींच्या वारसांचा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
ऋषीपूजन व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार अध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यवाह यांनी केला.
कार्यवाह ऍड भानुदास शौचे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उदय जोशी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.
महंत रामकिशोरदास शास्त्री, प्रमुख पाहुणे प्रा दिलीप फडके, प्रमुख पाहुण्या उद्योजिका सौ शरयू देशमुख, अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सम्योचीत मनोगते व्यक्त केली. सर्व सत्कार मूर्तीचे वतीने प्रा शिरीष गंधे यांनी सत्काराला उत्तर दिले.
सत्कार मूर्तींचा परिचय सुहास भणगे, धनंजय पुजारी ,पं वैभव दीक्षित, राजन कुलकर्णी, अनिल देशपांडे, सौ रत्नप्रभा गर्गे, सौ मंजुषा पुजारी यांनी करून दिला.
सौ राजश्री शौचे यांनी आभार मानले. सौ रोहिणी कुलकर्णी यांनी उत्तम सुत्रसंचलन केले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800