Friday, October 17, 2025
Homeयशकथापरोपकारी डॉ विद्या डागा

परोपकारी डॉ विद्या डागा

“यदा यदा ही धर्मस्य ग्लानि्र भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम स़ुजम अहम”

विविध प्रकारच्या रोगांनी पिडीत लोकांना बरं करणे, त्यांना मानसिक ताणातुन मुक्त करुन, धैर्य देवुन पुन्हा जीवन आनंदाने जगण्यासाठी सज्ज करणे यात पुणे येथील डॉ विद्या रतनलाल डागा यांना पराकोटीचं समाधान मिळतं.

डॉ विद्या रतनलाल डागा ( एम डी, गोल्ड मेडलिस्ट ) यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पायथ्यातील अडावद या गावी ६ ऑगस्ट १९५४ रोजी झाला. त्यांचे शिक्षण पुण्यातील एस पी काॅलेज आणि नंतर बी जे मेडिकल कॉलेजमध्ये झाले.

प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीना कोणी गुरु असतो, ज्याच्या मार्गदर्शनाने आयुष्यातील सर्व लक्ष्य पुर्ण होण्यास मदत होते. तसे डागा मॅडम यांच्या आयुष्यातील गुरू म्हणजे वैद्य कमलाबाई भंडारी होत. त्यांनी आयुर्वेदातील नाडी परीक्षेचे अनमोल मार्गदर्शन केले. त्यामुळे मी आज या मुक्कामावर पोचले आहे, असे डागा मॅडम कृतज्ञेने नमूद करतात.

त्या स्वतः रेकी ग्रँडमास्टर, प्राणीक हिलर, सायकोथेरेपीस्ट असल्यामुळे रुग्णांना तणावातून मुक्त करुन त्यांना सकारात्मक बनवतात. पंचकर्मामुळे शरीर शुध्दी होते आणि आयुर्वेदिक औषध व मंत्र सामर्थ्यामुळे सकारात्मक रिझल्ट मिळतात.

ज्या लोकांना टेस्ट ट्यूब बेबी करुनही आणि पाण्यासारखा पैसा खर्च करुनही यश मिळालेले नाही अश्या बऱ्याच केसेस मध्ये त्यांना यश मिळाल्यामुळे २००० या वर्षी त्यांना मुंबई येथे ओम हेल्थ सेंटर मध्ये गोल्ड मेडल मिळालं आहे.

२००८ पासून ते २०१२ पर्यंत नवी सांगवी येथे २००० चौरस फुटात आशीर्वाद हेल्थकेअर सेंटर या नावाने त्यांचे ३० बेडचे सेंटर होते. त्यात डॉ डागाज स्पाईन मसाज बेडची रोज ६०० पेशंटला प्रत्येकाला ४० मिनिटे फार ईन्फ़ा रेडची स्पाईन मसाज ट्रिटमेंट मोफत दिली जात होती. २००८-२०१३ या काळात अंदाजे एक लाख पेशंटला मोफत ट्रिटमेट दिली. त्यामुळे या रुग्णांना शुगर, बीपी, पाईल्स, हार्ट ब्लाॅकेज, कंबर दुखी, गुडघे दुखी, पॅरलिसीस आदीपासून मुक्ती मिळाली.

डॉ. डागा यांचे पती डॉ रतनलाल डागा यांचे २३ फेब्रुवारी २०१३ रोजी अकस्मात निधन झालं. त्यावेळी त्यांनी न डगमगता आपले दु:ख बाजूला ठेवून पतीचे राहिलेले स्वप्न शेवटच्या क्षणापर्यंत पुरेपूर पूर्ण करण्याचा निर्धार केला.

आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी २०१७ मध्ये महेश प्रोफेशनल फोरमला मोठी देणगी दिली. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील देवनगरी येथे परमपूज्य गुरुजी अरविंद
अंकुरजी न्यायधर्म संस्थेतर्फे गरीब नागरिकांसाठी उभारलेल्या हाॅस्पीटलला देणगी, लॅपटॉप, बाॅडी स्कॅनिंग मशीन, डॉ डागा स्पाईन मशीन दिलं. त्यांचे मलकापूर येथील मोठे बंधू डॉ अशोक काबरा, एम बी बी एस, हे तिथे निःशुल्क सेवा करीत आहेत. लातुर येथील त्यांच्या नणंद प्रा. चंद्रकला भार्गव या आदर्श महिला गृह उद्योगाचे काम बघत आहेत. त्यांनाही डागा मॅडमनी मदत केली असून त्यामुळे गरीब विधवा महिलांना त्यांच्या पायावर स्वतंत्रपणे उभे राहता येईल .

सद्याच्या कोरोना महामारीत सोलापूर येथे हिंगलाजमाता डीसीएचसी हाॅस्पीटलसाठी त्यांनी ऑक्सीजन जनरेटर मशीन दिलं आहे.  रक्ताचा एक थेंब न घेता बाॅडी स्कॅनिंगच्या मशीनने आपल्या शरीरातील ३३ अवयवांची तपासणी अल्पश्या दरात करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. अनेक ठिकाणी अल्पश्या दरात शिबिरे घेण्यासाठी त्यांना बोलवण्यात येत आहे.

डागा मॅडम यांची २००८ मध्ये दूरदर्शनवर माझी माय या कार्यक्रमात मुलगा डॉ अभय याच्यासह मुलाखत घेण्यात आली. तर २००९ या वर्षी केबी ९ या न्युज वाहिनीने डॉ विद्या डागांची आयुर्वेद, पंचकर्म आणि आजीबाईचा बटवा, वंध्यत्व या विषयावर मुलाखत घेतली होती.

डागा दाम्पत्याच्या निस्वार्थी वैद्यकीय सेवेबद्दल त्यांना आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल श्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते २००१ साली हैदराबाद येथे इंदिरा गांधी सद्बभावना पुरस्कार मिळाला.तसेच २० जानेवारी २००५ रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवर बॅंकाक येथे गोल्ड स्टार मिलेनियम ऍवार्ड मिळाला. तर बेंगलोर येथे २५ मार्च २०१२ रोजी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री श्री एम व्ही राजशेखरन यांच्या हस्ते मदर तेरेसा एँवार्ड देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटनतर्फे १३ जानेवारी २०१३ रोजी “माहेश्वरी रत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

डॉ. विद्या डागा यांचा मुलगा अभय व सून सौ मोनिका व मुलगी रुपाली हे सर्वच डॉक्टर असून निस्वार्थी रुग्ण सेवेसाठी प्रसिद्ध आहेत. या सर्वांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

23 COMMENTS

  1. I know Dr Daga personally. She is very kind and generous in social activities. We owe to give back to society in which we live is her mantra. I wish her all the best for all her future social causes.

  2. Dr Vidya Daga is very down to earth, energetic, always on her toes and wanting to help people and society even at this age.. I feel Slsecret behind her energy level is her will power and Bed therapy which she gives at her clinic in Sangavi.. .. Had taken treatment for my and my husband’s back.. Within a month got good results and continued till the pain was completely gone. Best part is it does not have any side effects and no need to take any medicine… Charges are also nominal… Must give it a try consistently for few days or as suggested by her to get good results..

    Great going Mam.. Keep up the good work you are doing towards society and stay energetic and keep inspiring.. All the very best👍👍😊

  3. अशा प्रकारे समाजसेवा करत राहणं त्यासाठी मन मोठ लागत आणि तुमच्यासारखे मन मोठे असणारे असेल तर भाग्यच आहे
    तुमचे हे कार्य असेच सुरू राहावे
    अशी मनोकामना करते

  4. Vidya, you are basically a God Loving person and so are extremely sensitive to the sufferings of persons approaching you. God has therefore gifted you with Kindest Heart and you have earned Blessings from an infinite number of Healed Soules. Your Great Karma will go a long way to make your Heirs’ Life more meaningful and more successful. God Bless You Dear.

  5. it’s Very good and Commendeable Job.Mam keepitup.Tumhi khup chhan kam kart ahat. Tumcha ya karya mule kiri tari lokanche Ayusha margi lagale.tumhi mazha Inspayar ahat.

  6. Excellent work of Dr. Vidya Daga in this age she is very enstusiatic and curing many patients with less cost or no cost. We are proud of her being my mother

  7. She has done and still doing great job. Her treatment is very effective. I have self experience. Good diagnosis. Always ready to help.

  8. माझाही डॉ विद्या डागा यांचेशी 2012 पासून, संपर्क आला असुन त्या अतिशय साधी राहनी व उच्च विचार अशा आहेत अनेक पारिवारीक कार्यक्रमात त्यांनी मला आमंत्रित करुन सन्मान दिला.. सामाजिक बांधिलकी जपत आपला डॉक्टरी पेशा त्या प्रामाणिक पणे जपत असुन मुलगा व सुनही त्यात हातभार लावत असतात ,वेळोवेळी विद्याताईंचे बंधु ही मलखापुरवरुन येवुन मदतीचा हात देत असतात व मार्गदर्शन करत असतात..
    पति रतनलाल डागा यांचे आकस्मित निधनाने अनेक व्यवसायीक व व्यवहारीक अडचनी आलेल्या असताना खचुन न जाता खंबिरपणे परीवार सांभाळुन सर्व बाजुने प्रयत्नशील राहुन एक आदर्श महिला कशी असावी याचे समाजाला जीवंत उदाहरण दाखवुन दिले आहे..
    डॉ. ज्ञानेश्वर मुंडलिक
    सुमन लोकसेवा संस्था

  9. डॉक्टर विद्या डागा यांचे कार्य खरच खूप प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या उपचारामुळे खूप लोकाना फ़रक पडला आहे

  10. Everyone will always remember the work you did and the service you rendered to the patients Your journey is very inspiring
    Daga madam👍👍

  11. आपण समाजाचं देण लागतो या भावनेतून डॉ. विद्या ताई डागा आणि सर्व कुटुंबीय हे वैद्यकीय तसेच इतर माध्यमातून समाजाची सेवा करीत आहेत त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार 🙏
    तसेच सन्माननीय श्री देवेंद्रजी भुजबळ साहेब यांनी डॉ. विद्या ताई यांनी समाजसेवेसाठी राबविलेल्या सर्व उपक्रमांची इत्यंभूत माहिती दिली त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार.🌹

  12. Dr daga hya ek changlya dr. Tar ahetac pan samajat tyanche social work khup great ahe.tya ek dayalu,mayali,lokanchya sankatat dhaun janari mauli ahe.tyanchya mule khup khup family’ anandane jagtattyani khup garibana free ilaj kela,khup vyadhigrathani diva dili tyanchya ya sarva social kaaryachei mi geli 15 varshapasun sakshidar ahe bhujbal sarani eka changlya vyaktimatvala samajat dakhavnyache khup changle kam kale tya baddal dhanyavad.mam che abhinandan

  13. Really ma’am is giving very valuable service to all,our family health issues r always solved with medicine given by Dr vidya ma’am,she is very hardworking,ever ready,positive energy spreader which is helpful to us,Thanks a lot ma’am🙏🙏🙏

  14. डॉ विद्या ताई डागा यांचा आयुष्याचा प्रवास जनतेसाठी असुन डागा परिवाराने सामाजिक बांधिलकीची ही लक्ष्य ठेवून सुरवात केलेली . आपल्या देशातील पेशंट कशे बरे होऊ शकतील याचा प़यत्न ते करीत असुन आदरणीय श्री देवेंद्र भुजबळ सरांनी जनतेपर्यंत ते पोचविण्याचां प़यत्न केलेला आहे अश्या दोघेही आदरणीय व्यक्तींना खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा

    मदन रामनाथ लाठी
    न्यु सांगवी,
    पुणे

  15. Really outstanding service Dr vidya ma’am providing to all ,our family health issue we r covering with medicine given by MA’am only,very hardworking ,positive energy spreader,thanks a lot ma’am

  16. आपल्या चालू असलेल्या चांगल्या कार्याला सलाम।
    ईश्वर आपणास उदंड शरिरारोग्य,यश,किर्ती प्रदान करो।
    मनस्वी हार्दिक अभिनंदन।
    फरपट परिवार मलकापूर।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप