नमस्कार मंडळी,
या आठवड्यात, योगायोगानेच कवयित्री शांता शेळके यांच्याविषयी, त्यांच्या गीतांविषयी रसग्रहण करणारे डॉ गौरी जोशी कंसारा व श्री विकास भावे यांनी लिहिलेले सुंदर लेख लागोपाठ २ दिवस प्रसिद्ध झाले. त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला.
श्री सुधाकर तोरणे यांनी डॉ. अमोल अन्नदाते यांच्या “एका मेडिकल कॉलेजचं बाळंतपण” या पुस्तकावर लिहिलेले परिक्षणही वाचकांना आवडलं.
प्रा.डॉ.स्मिता होटे यांनी लिहिलेली मनीष बोबडे या मनस्वी चित्रकाराची कथाही खूप जणांना आवडली.
काही प्रतिक्रिया इंग्रजीत प्राप्त झाल्या आहेत.
चापेगडी गावही खूप जणांना भावले. निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा, ही विनंती.
आपली,
टीम एनएसटी
विकास भावे यांनी “ही चाल तुरु तुरु” या गाण्याचं रसग्रहण छान केले आहे. माझी या गाण्याबद्दल थोडी वेगळी आठवण आहे. हे गाणे त्याच्या चालीमुळे विशेष लोकप्रिय झाले. सहज म्हणता येण्यासारखे, ठेका धरता येण्यासारखे.
जयवंत कुलकर्णी आमच्या पार्ल्यातले. आणि हे गाणं प्रसिद्ध झालं तेव्हां आम्ही शाळकरी मुलं होतो आणि आताच्या काळातील मुलांसारखी समज(?) मुळीच नव्हती. बावळटच. पण सारेच. तर, त्यातील ही चाल तुरु तुरु ..एव्हढंच आम्हांला म्हणायला आवडायचे. पुढचा अर्थ डोक्यावरून. आमच्यापैकी कोणी मधेच फास्ट चालू लागले की ही ओळ म्हणायचो नि फिदीफिदी हसायचो. जयवंतकाका टिळक मंदिरात कार्यक्रम करायचे तेव्हां त्यांच्या घरून तबला, पेटी, डग्गा नेणे हे आम्हां वानरसेनेचे काम.(तेवढाच संगीताशी संबंध !) त्याकाळी रिक्षा, टॅक्सी वगैरे चैन नव्हती. मग दिसतील त्या पोरापोरींना पिटाळले जायचे. आम्हांला आवडायचे. कारण छान छोटासा बंगला, त्यांत गुलाब,चाफा इ . फुलझाडे.
काका बहुदा घरात नसायचे. त्याकाळी दारे उघडीच असायची. आम्ही बाहेरून काकूना आवाज द्यायचो. त्या लगबगीने यायच्या, खूप गोड हसून साहित्य देण्यापूर्वी आम्हांला खाऊ द्यायच्या, फुले द्यायच्या.
आम्हांला वाटले होते की गाणेही काकांनीच लिहिले आहे. म्हणून मी एकदा त्यांना विचारले, तुम्ही तुरुतुरु चालता म्हणून काकांनी लिहिले ना ? त्यावर सारे मोठ्याने हसले ..पटून.. आणि त्यावेळी काकू ज्या लाजल्या ते अजून लक्षांत आहे. मग त्या दिवसानंतर, काकूंना आवाज द्यायचा म्हणजे आम्ही ..”ही चाल तुरु तुरु …” मोठ्याने गायचो. गायचो कसले …नरड्यापासून …😄 काकू खाऊ घेऊनच बाहेर…
सूर आणि ठेकाच लक्षांत आणि सहलीला अन्ताक्षरीसाठी म्हटले जाणारे गाणे तुमच्या सुरेख रसग्रहणामुळे आज परत एकदा नीट वाचले. मात्र खूप वर्षांनी त्या बंगल्यापर्यंत धडकून आले.🤗

– नीला बर्वे, सिंगापूर.
नमस्कार,
श्रीमती शांता शेळके यांच्यावर लिहीलेला लेख फार आवडला. असे चांगले मराठी आता सहसा वाचायला मिळत नाही. मी शांताबाईंना प्रत्यक्ष भेटले आहे.
लेखिका गौरी इथे माझ्या भागातीलच आहेत. धन्यवाद.

– डॉ. सुलोचना गवांदे, न्यू जर्सी, अमेरिका.
सुनील देशपांडे, पुरुषोत्तम पवार आणि वेलणकर यांचे नेत्रदानाविषयी लेख वाचले फारच माहितीपूर्ण नेत्र दानाव्यतिरिक्त, नेत्रदान रोपण, डोळ्यांची संरचना आणि इतर बर्याच गोष्टी समजल्या. फारच छान.

– सुधीर थोरवे, पर्यावरण तज्ञ, नवी मुंबई.
१८ च्या न्यूजस्टोरीटुडे मध्ये सेवानिवृत्त माहिती संचालक श्री सुधाकर तोरणे यांनी लिहिलेली डॉ अमोल अन्नदाते यांची माहिती अतिशय प्रेरणादायी आणि वास्तवावर बोट ठेवणारी आहे.
डॉक्टर स्मिता होटे यांनी लिहिलेली, मनस्वी चित्रसाधक तसेच आम्ही चापेगडीकर ही प्रिया रामटेककर यांनी लिहिलेली शाळेतील कथा आवडली. आपले मनःपूर्वक स्वागत.

– माधव अटकोरे, जेष्ठ पत्रकार, नांदेड
डाॅ अमोल अन्नदाते यांचा अनुभव खुपच बोलका आहे. आपले राजकारणी लोक कधी सामान्य माणसाची छळवणूक करतात. तरीहि न हार मानता कार्य करणाऱ्या डाॅक्टरना मनापासून सलाम.

– मंदा शेटे. चेंबूर, मुंबई. 👍
डॉ.स्मिताजी होटे यांनीं मनस्वी चित्रसाधक या लेखात चित्रकार मनीष बोबडे यांच्या चित्रकलेतील प्रवासाचा संपूर्ण जीवनपटच उभा केला. खरचं परिस्थिती कितीही बेताची असू दे माणसाच्या अंगात असलेले कलागुण आणि त्याची काम करण्याची प्रामाणिक जिद्द त्याला आपल्या ध्येयापर्यंत जरूर पोहचवत असतो ते ह्या अवलिया चित्रकाराने जगाला दाखवून दिलं आहे. आंतरराष्ट्रीय कला मोहत्सवात मिळालेला पुरस्कार आणि शिल्पकलेतील भीष्म पितामह श्री राम सुतार यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार हेच त्यांच्यांत दडलेल्या उमाद्यां चित्रकाराचं आणि उत्तुंग प्रतिभेच दर्शन घडवितो !
डॉ स्मिता जी होटे म्हटल्याप्रमाणे कलाकार हा जन्मालाच यावा लागतो !…एवढं मात्र नक्की !

– अनिल घरत – पिरकोन, उरण, रायगड
अपंग, आर्मी, हॉस्पिटल मधील रुग्णांना रिक्षा द्वारे कायमस्वरूपी मोफत प्रवास सेवा देऊन देशसेवा करणारे रिक्शा चालक श्री पंकज शर्मा यांना मानाचा मुजरा.
खरेच आजच्या धकाधकीच्या व जीवघेण्या स्पर्धेच्या युगात माणुसकी लोप पावत चालली आहे. मात्र दुसरीकडे माणुसकी जिवंत ठेऊन देशसेवा करणारे श्री पंकज शर्मा यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

– मोहन आरोटे, कल्याण 🙏
गर्दी शिवाय मुंबई जगत नाही. इस्पितळात जा, बँकेत जा, नाटक सिनेमा पाहण्यास जा, पोस्टात जा. गेल्या गेल्या काम झाले रांगेत उभे राहावे लागले नाही असे कधी होतच नाही. सगळीकडे गर्दीशी सामना करावाच लागतो. रात्रंदिवस आम्हा गर्दीचा प्रसंग. लेख खूप छान आहे. आवडला.
– बकुल बोरकर
प्रिया जी,
खूप सुंदर गावाचं वर्णन केलंत तुम्ही आणि प्रसंग अगदी भावुक करून गेले. मलाही माझ गाव आठवलं.

– प्रकाश फासाटे. मोरोक्को (नॉर्थ आफ्रिका)
चापेगडी गाव अतिशय भावले. दुर्गम आदिवासी भागातील गावाने आयुष्याला पुढे जाण्याची जिद्द दिली. व्वा सलाम. गावातील मैत्रिणीसंदर्भातील हद्य प्रसंग, शाळेतील शिक्षकांनी माती फेकून मारण्याचा प्रसंग हृदयस्पर्शी आहेत. ओघवत्या शैलीतील गावाचे मोठेपण अप्रतिम आहे.

– विलास आनंदा कुडके
Very good writing of u about Shri Sarode covering all aspects of his life especially the childhood memories and hardship he had to undergo. I also remembered the hard work I had to do in my young age.
Tell my best wishes to him on his birthday and Pray for his happy, healthy and prosperous life ahead for many many years !
– D L Thorat, Retd. Jt. Secretary, Govt. Of Maharashtra.
I know Dr Daga personally. She is very kind and generous in social activities. We owe to give back to society in which we live is her mantra. I wish her all the best for all her future social causes.
– Abaya kabra.
Art is neither a profession nor a hobby. Art is a way of being and a way of life.
Great piece of art @ManishBobade. I appreciate the details and specifics of all paintings in this article.
It’s eloquent ! Great Article 👍
– Sanket Kathale
Dr Vidya Daga is very down to earth, energetic, always on her toes and wanting to help people and society even at this age.. I feel Slsecret behind her energy level is her will power and Bed therapy which she gives at her clinic in Sangavi.. .. Had taken treatment for my and my husband’s back.. Within a month got good results and continued till the pain was completely gone. Best part is it does not have any side effects and no need to take any medicine… Charges are also nominal… Must give it a try consistently for few days or as suggested by her to get good results..
Great going Mam.. Keep up the good work you are doing towards society and stay energetic and keep inspiring.. All the very best👍👍😊
– NIDHI Jaju.