काळ किती क्रूर असू शकतो, याचे दुर्दैवी उदाहरण नुकतेच बघायला मिळाले आणि काळजाचे पाणी पाणी झाले.
झाले असे की सातारा जिल्ह्यातील कासार शिरंबे या गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील अत्यंत हुशार असलेली कै.अमृता विजय पाटील ही मुलगी आपले डॉक्टर व्हायचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँकेचे कर्ज काढून रशियात एमबीबीएस करण्यासाठी गेली. पण ऐन तारुण्यात तिचे २६ डिसेंबर २०२४ रोजी अचानक आलेल्या हृदय विकाराच्या झटक्याने जागीच निधन झाले.
कुमारी अमृताचे पार्थिव इकडे कसे आणायचे, ही मोठीच समस्या निर्माण झाली. पण पुण्याचे नवनिर्वाचित आमदार श्री हेमंत रासने यांनी केंद्रीय मंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नाने तिचे पार्थिव ३० डिसेंबर रोजी तिच्या गावी आणण्यात येऊन पुढे तिच्यावर रितसर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमृता च्या अशा अनपेक्षित मृत्यूने तिच्या कुटुंबियांवर जणू आकाश कोसळले आहे. तसेच देश एका होतकरू डॉक्टरला मुकला.
पण आता अमृता च्या कुटुंबावर कोसळलेले दुसरे संकट म्हणजे तिने बँकेकडून घेतलेले शैक्षणिक कर्ज फेडण्याचे होय. यासाठी देश विदेशातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांना कळकळीचे आवाहन करण्यात येते की कृपया त्यांनी उदारहस्ते मदत करून अमृताच्या कुटुंबाला कर्ज मुक्त होण्यासाठी हात भार लावावा. तिच्या कुटुंबाची परिस्थिती कशी आहे, याची कल्पना आपल्याला तिचे घर पाहून येईलच.
आपण अधिक माहितीसाठी अमृताची बहीण रेश्मा हिच्याशी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9158658176
किंवा आपली मदत पुढील 👇 क्यू आर कोड वर थेट पाठवू शकता.
आपण दिलेल्या मदतीचा स्क्रीनशॉट तसेच आपले नाव, गाव, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र +91 9869484800 या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास ते अवश्य प्रसिद्ध केले जाईल.
धन्यवाद.
आपली
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800