ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत !!
नमस्कार मंडळी.
भारतीय चित्रकला जगाच्या कॅनवास वर ठेवण्याचं श्रेय प्रसिद्ध भारतीय चित्रकार पैगंबरवासी मकबुल फिदा हुसेन अर्थातच एम एफ हुसेन ह्यांना जातं.
हुसेन साहेबांची चित्र ही जितकी विवादित तितकीच कलात्मक आणि गुढ असतात. रामायण, महाभारत अशा विषयांवर भारतीय संस्कृतीशी निगडित चित्र काढताना त्यांनी अनेक वादग्रस्त कलाकृतीही निर्माण केल्या आहेत. परंतु तरीही त्यांची गंगा जमुना तहजीब या विषयावरची चित्रे आजच्या लिलावांमध्येही लाखो, करोडो रुपये कमावतात.
अमेरिकेतल्या रिचमंड व्हर्जिनिया येथे राहणारे डॉक्टर शांताराम तळेगावकर हे एकदम कलाप्रेमी रसिक आहेत.. एम एफ हुसेन यांचे “द गॅंजेस राऊट” (the ganges route) हे चित्र त्यांनी सॉदबिज् (Sotheby’s) लिलावामध्ये विकत घेतले आणि ते त्यांच्या घरी ठेवले आहे. या चित्रामध्ये अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या त्या नावेचा, संथ लयीत वाहणाऱ्या प्रवाहाचा आणि शिडात भरून घेतलेल्या वाऱ्याचा ठाव घेताना माझ्या मनात आलेले विचार माझ्या कवितेतून मी तुमच्यापुढे सादर करत आहे.
कवितेच्या यूट्यूब चॅनलची लिंक इथे खाली देत आहे.
मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.
— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 9869484800