Wednesday, March 12, 2025
Homeपर्यटनरमणीय व्हिएतनाम : २

रमणीय व्हिएतनाम : २

व्हिएतनाम दौऱ्यासाठी शक्यतो अमेरिकन डॉलर स्वरूपात चलन घेतलेले बरे. आपण गरजेनुसार डोंग चलन घेवू शकतो. आम्हाला तेथे तिन्ही ऋतू अनुभवायला मिळाले. हो ची मिन्ह येथे उन्हाळा व दमट हवामान जाणवत होता. देशाच्या मध्य भागात थंड तर दक्षिणेस अती थंडी व पावसाळा अनुभवला.

येथील लोक प्रामुख्याने मांसाहार करतात. आहारासोबत प्रामुख्याने भात, नुडल्स, सूप, सॉस, सॅलड, फळे असतात. मसाल्यांचा वापर अत्यंत कमी असतो. आम्हाला भारतीय रेस्टॉरंट मध्ये सामिष भोजन उपलब्ध व्हायचे.

व्हिएतनाममध्ये नुकताच नव वर्षाचा सण साजरा झाला होता. आपल्याकडील दीपावली सारखा हा सण घरोघरी साजरा होतो. सर्वत्र झेंडू, शेवंती फुलांच्या कुंड्या अन् विविध आकारातील विशेषतः लाल रंगाचे आकाश दिवे व सर्वत्र देशाचा झेंडा फडकलेला नजरेस पडत होता.

मेकाँग डेल्टा : दुसऱ्या दिवशी सर्व आन्हिकं आटोपून सकाळीच हॉटेल चेक आउट करून आम्ही मेकाँग डेल्टा टुर साठी बाहेर पडलो. बंदरातून बोटीने आम्ही माय थो रिव्हर पोर्टवर पोहोचलो. जेथे स्थानिक व्यावसायीकांनी मधाचा चहा व इतर पदार्थांची चव चाखायला देत आमचे स्वागत केले.

येथे एक अजस्त्र अजगर पाळलेला होता. आम्ही तो गळ्यात लपेटून फोटो काढले. येथे सारे सेंद्रिय उत्पादन घेतले जाते. पर्यावरण संवर्धनासाठी बेटावर बॅटरी चलीत वाहने होती. आंब्याला सर्वत्र मोहोर दिसत होता. झाडांस फणस फळे, ड्रॅगन फ्रूट लागली होती. स्थानिकांनी केलेले प्रसिद्ध कोकोनट कँडीचे समक्ष उत्पादन बघत आम्ही चव चाखली.

स्थानिक विक्रेत्यांनी पारंपरिक गाणी सादर करत आम्हास स्थानिक फळे खायला दिली. तेथेच विविध स्थानिक उत्पादित माल विक्रीसाठी ठेवलेला होता. स्थानिक चिंचोळ्या बोट मधून दुतर्फा वॉटर कोकोनट लागवड असलेल्या खाडीतील जलप्रवास अनुभवताना फार मजा आली.

तासभर जल प्रवसाचा हा विलक्षण आनंद मनात साठवत सायंकाळी आम्ही हो ची मिन्ह ला परतलो. रात्री भोजन आटोपून लागलीच आम्ही विमान तळ गाठले. जेथून रात्री व्हिएतनाम एअर लाईन्सने ‘द नांग’ शहरात फिवीटेल तारांकीत हॉटेल वर मुक्कामी पोहोचलो.
क्रमशः

— लेखन : संजय फडतरे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित