सिंगापूर स्थित लेखिका नीला बर्वे यांनी लिहिलेल्या आणि न्यूज स्टोरी टुडे ने प्रकाशित केलेल्या “कोवळं ऊन” या कथा संग्राहाचे नुकतेच शानदार प्रकाशन झाले.
या पुस्तकासाठी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी त्यांच्या हस्ताक्षरात दिलेल्या शुभेच्छा. हे या पुस्तकाचे मोठेच वैशिष्ट्य आहे. या शुभेच्छा, जशाच्या तशा पुस्तकात छापण्यात आल्या आहेत. शुभेच्छांचे हे पान पुढे देत आहे.


पद्मश्री डॉ शंकरबाबा पापळकर आणि पद्मश्री उदय देशपांडे यांनी पाठविलेले सुंदर शुभेच्छा संदेश कार्यक्रमात वाचून दाखविण्यात आले. तर पद्मश्री प्रसाद सावकार यांचा ध्वनिमुद्रित संदेश ऐकविण्यात आला.

पद्मश्री डॉ शंकरबाबा पापळकर आपल्या संदेशात म्हणतात,
२२.८.२०२५.
माझ्या सुहृद भगिनी नीला बर्वे यांच्या पुस्तकाचे आज प्रकाशन होत आहे आणि त्यांनी मला आठवणीने आमंत्रण दिले आहे, याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे.
सध्या माझी तब्येत बरी नसल्याने इच्छा असुनही मी प्रकाशन समारंभाला येऊ शकत नाही म्हणून या पत्राद्वारे माझ्या शुभेच्छा व्यक्त करीत आहे.

नीलाताईंची लेखणी किती गोड आहे, याचा मला अनुभव आला आहे. खरं म्हणजे, दिव्यांग, मतिमंद, निराधार व्यक्तींसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करण्यापूर्वी मी मुंबईत ३० वर्षे पत्रकारिता केली आहे. “देवकीनंदन गोपाला” या मासिकाचा संपादक ही राहिलो आहे. त्यामुळे मी हे अनुभवले आहे की, कुणी लेखक दुसऱ्या लेखकाचे, कुणी पत्रकार दुसऱ्या पत्रकाराचे कधी कौतुक करीत नाही. पण नीलाताईंनी माझ्या कार्याचे इतके कौतुक केले आहे की, त्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. समाजातील पीडित, दुःखी लोकांविषयी त्यांना खूप ममत्व वाटते. हा अतिशय दुर्मिळ गुण त्यांच्यात आहे. या बद्दल माझा त्यांना मनापासून सलाम.आज समाजाला, देशालाच नाही तर सर्व जगाला अशा संवेदनशील मनाच्या माणसांची खूप मोठी गरज आहे. अशा लोकांमुळेच हे जग सुंदर होईल. जगातील भेदभाव दूर होईल.आणि आहे रे, नाही रे या वर्गातील दरी दूर होईल असे मला वाटते.
भगिनी नीला यांची लेखणी दिवसेंदिवस बहरत राहो, त्यांच्यामुळे इतरांच्या जीवनात आनंद निर्माण होवो, या शुभेच्छा देऊन देतो आणि त्यांच्यासाठी एक शेर पेश करतो….
“आग तो लग गई घर मे
बचा ही क्या है
बच गया मैं तो समझो
जला ही क्या है
अपने कोशिश का
नतीजा है
मुकद्दर अपना
वरणा हातो के लकिरो मे
रखाई क्या है….”
धन्यवाद.
आपला
पद्मश्री डॉ शंकरबाबा पापळकर, अमरावती.
पद्मश्री उदय देशपांडे यांचा शुभेच्छा संदेश…..
नमस्कार.
नीलाताई बर्वे यांच्या “कोवळं ऊन” या कथा संग्रहाच्या प्रकाशन समारंभाचे मला अत्यंत अगत्याने पाठविलेले निमंत्रण मिळाले. खरं म्हणजे माझी या कार्यक्रमाला येण्याची फार इच्छा होती. पण नेमका आजच्याच दिवशी आणि याच वेळी अंधेरी येथील एका कार्यक्रमास मला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी जावे लागत असल्याने मी उपस्थित राहू शकत नाही, याचे वाईट वाटतेय.

माझ्या मल्लखांबाच्या कामगिरीविषयी आतापर्यंत अनेक लोकांनी लिहिले आहे. विविध दूरचित्रवाणी वाहिन्या आणि आकाशवाणी वर माझ्या मुलाखतीही झाल्या आहेत आणि होत असतात.
परंतु, साधारण मे महिन्यात नीलाताई यांनी माझ्यावर, माझ्या कार्यावर जो मुद्देसूद, परिपूर्ण आणि सुंदर भाषेत लेख लिहिला. हा लेख न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वर प्रकाशित झाला. मला हा लेख, त्याची मांडणी, सजावट मनापासून आवडली. त्या बद्दल मी त्यांचे, या निमित्ताने आभार मानतो.
नीलाताई यांचा कथा संग्रह नक्कीच वाचकप्रिय ठरेल असा मला विश्वास वाटतो. या कथासंग्रहास, आजच्या कार्यक्रमास आणि नीलाताई यांच्या पुढील लेखन कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो.
आपला स्नेहांकित,
उदय देशपांडे. दादर, मुंबई.
चार पद्मश्रीं शिवाय या कार्यक्रमासाठी असंख्य व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातील काही प्रमुख म्हणजे, माजी कुलगुरू प्रा डॉ विजय पांढरीपांडे, हैदराबाद; लेखिका चित्रा मेहेंदळे, अमेरिका; साहित्यिक तथा निवृत्त सह सचिव राजाराम जाधव; चित्रकार विजयराज बोधनकर; लेखक तथा दूरदर्शनचे निवृत्त संचालक श्री चंद्रकांत बर्वे; जेष्ठ हिंदी साहित्यिक प्रा डॉ एम डी इंगोले; साहित्यिक सर्वश्री उद्धव भयवाळ; सुनील चिटणीस; कवी सुभाष कासार, नवी मुंबई; लेखिका विजया सणस, मुंबई; लेखिका सौ स्नेहा मुसरीफ, पुणे ; उद्योजिका प्राची जगताप, पुणे आदी होत.
उपरोक्त सर्वांचे टीम न्यूज स्टोरी टुडे मनापासून आभारी आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

कोवळी उन पुस्तकाचे परिक्षण आवडले.आता पुन्हा पाठविण्यात उपयुक्त नाही असे वाटते.नीला बर्वे यांनी फारच चांगले लिहिले आहे.पुस्तकाची एकूण दर्जेदार मुखपृष्ठ, न्यूज टुडे प्रकाशित सर्व अतिशय उत्तम बांधणी,टाईप वैगेरे पाहून देवेंद्र भुजबळ व प्रकाशिका अलकाताई भुजबळ यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत केले पाहिजे…. सुधाकर तोरणे .