“श्री क्षेत्र पद्मालय”
गणपतीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ असलेले जळगाव पासून ३० किलोमीटर वर एरंडोल तालुक्यात टेकडीवर वसलेले गणेश मंदिर. पद्मालय म्हणजे कमळाचे घर असलेला गणेश. मंदिराच्या समोर कमळांचा तलाव आहे. तलावात सप्तरंगी कमळ आहेत, म्हणूनही याला पद्मालय गणेश असे नाव पडले असावे.

आजुबाजुला घनदाट जंगल आहे. पावसाळ्यात संपूर्ण जंगलात हिरव्या वृक्षाची आकर्षक दृश्य दिसतात. नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक भाविक येथे पावसाळ्यात येतात. गणेश भक्तांचे हे श्रद्धास्थान आहे. हा नवसालाही पावतो.

हेमाडपंथी रचना असलेल्या या मंदिरात दोन स्वयंभू गणेश मूर्ती आहेत. एकाच व्यासपीठावर असलेल्या उजव्या व डाव्या. दोन सोंडेच्या गणपती मूर्ती विराजित आहेत. जगातील हे एकमेव असे मंदिर असावे.

एक आमोद एक प्रमोद. दोन्ही मूर्ती मध्ये प्रवाळ आहेत. उजव्या कवटीचे त्रिशंकण उजवीकडे आहे. तर डाव्या बाजूला डाव्या कवटीचे. दगडांच्या आतील बाजूस असलेले असे हे मंदिर आहे. आजुबाजुला अनेक मंदिरे आहेत. विविध औषधी वनस्पती पद्मालय मंदिराच्या परिसरात आढळतात.
सद्गुरू गोविंद शास्त्री महाराज बर्वे याना रिद्धी सिद्धी प्रसन्न झाल्या होत्या. त्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. गणेश पुराणात या मंदिराचा उल्लेख आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारापाशी ४४० किलो वजनाची भली मोठी घंटा आहे

मंडळी असे हे दोन स्वयंभू गणेश असलेले पद्मालय गणेश मंदिर. नक्की एकदा तरी भेट द्यावी असे.
क्रमशः

— लेखन : मीरा जोशी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
गणेश भकतांना नवनवीन ठिकाणच्या गणपतीची माहिती घेणे आवडते. गणेशाचे कोणतेही रूप बघताना भक्तांना भावत असते.
जय गणेश.
नमन वंदन.