समाजात वाचन, लेखन संस्कृती चांगल्या पद्धतीने रुजावी, आजच्या पिढीचे कार्य येणाऱ्या नव्या पिढ्यांसही प्रेरणादायी ठरावे तसेच शैक्षणिक, पर्यावरण, निसर्ग, अध्यात्मिक, सामाजिक अशा विविध बाबींची जोपासना व्हावी यासाठी स्वतः कवयित्री असलेल्या माधुरी काकडे या सातत्याने प्रयत्नशील असतात.
माधुरी काकडे या “मधुसिंधू” या काव्य प्रकाराच्या जनकही आहेत. नुकताच त्यांनी एकच काव्य प्रकार, एकच प्रकाशक, एकच चित्रकार, सहभागी सर्व महिला व सर्व महिलांनीच लिहिलेल्या; अशा २६ स्वतंत्र मराठी, १ हिंदी अशा एकूण २७ मधुसिंधू काव्यसंग्रहांचे विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या २७ महिलांच्याच हस्ते एकाच दिवशी, एकाच वेळी, एकाच मंचावर नुकतेच दौंड येथे अभिनव, ऐतिहासिक प्रकाशन करण्याचा अभिनव कार्यक्रम घडवून आणला.

या कार्यक्रमात पुढील कवयित्रींच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.

या अभिनव उपक्रमाविषयी अनेक प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्यातील निवडक २ प्रतिक्रिया पुढे देत आहे.
१) आदरणीय माधुरीताई,
नेहमी भ्रमणचित्रध्वनीतून दिसणाऱ्या, सुंदर शब्दात काव्य लिहिणाऱ्या, गझलेतून झरणाऱ्या, ऱ्हस्व, दीर्घ, शुद्धलेखनाची जाण असणाऱ्या, सर्वांना मधुसिंधू काव्यातून बोलणाऱ्या, आपलेपणाने काव्य लेखनास प्रेरणा देणाऱ्या माधुरीताई यांची प्रत्यक्ष भेट झाली अन् मनस्वी आनंद झाला. त्यांचे कार्य, धैर्य, धाडस, चिकाटी, कर्तृत्व, नेतृत्व हे सर्व कार्यक्रमाच्या नियोजनातून प्रकर्षाने जाणवले जणू आपल्या घरचे कार्य आहे ते पार पाडण्यासाठी काय काय करावे लागते आलेल्या माणसांची सोय त्यांची काळजी, हवे नको विचारपुस, त्यातील आत्मियता हे सारे पाहून भारावून गेले. ज्या गोष्टींचा आम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता, आपला पण एखादा काव्यसंग्रह प्रकाशित होईल ते स्वप्न सत्यात उतरले. मी कधीही एवढ्या कवितेचे लेखन केले नव्हते. मला तर नेहमी वाटायचे आपल्याला काय लिहिता येईल ? त्या कुणाला आवडतील ? पण माझ्यातली ही उर्मी तुम्ही दाखवून दिली. तुमच्या प्रेरणेने हे साध्य झाले.
पण, शुध्द प्रत तयार करताना तुम्हांला खूप त्रास झाला याची खंत वाटते. असो.. तुमची, सर्व कवयित्रीची भेट झाली ही आनंदाची पर्वणी तुमच्यामुळे आम्हाला मिळाली. खुप खुप धन्यवाद ताई
— दीपलक्ष्मी वडापूरकर.
२) माधुरीताई, तुम्ही जे परिश्रम घेतलेत, त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे आहेत. इतकी मेहनत कोणीच घेत नाही. मधुसिंधू वरील आपले प्रेम शब्दातीत आहे. त्याचबरोबर सर्वांना सांभाळून घेतलत. लेखनातील असंख्य चुका सुधारल्यात. आम्हीच खूप कमी पडलो याबद्दल खंत वाटते. अगदी शिकवण्यापासून ते थेट काव्यसंग्रह छापून आमच्यापर्यंतचा हा प्रवास खूप मोठा आणि खडतर होता. पण आपल्यामुळे खूप शिकायला मिळाले. विशेष म्हणजे आपल्यातील संयम, चिकाटी, मेहनत ह्या गुणांची प्रशंसा करावी तितकी थोडी आहे. आपणा कुटुंबातील सर्वांची साथ आपणास होती.
कार्यक्रम खूप बहारदार झाला. दिर्घकाळ स्मरणात राहील असा. हे सगळ जुळवून आणणे खूप कठीण असते. नेहमी हसतमुख असता पण कार्यक्रमात थोडा थकवा चेह-यावर जाणवला. तो तुम्ही भासू दिला नाही अगदी गोड आणि खणखणीत शब्दात आपले विचार मांडलेत, सर्वांची जातीने चौकशी करून जाईपर्यंत काळजी घेतलीत हे मी न येता ही सारे दिसत होते, ऐकत होते. कार्यक्रम खूप छान झाला. आता खरंच थोडे दिवस विश्रांती घ्या. तब्येतीची काळजी घ्या.
— संजीवनी कुलकर्णी
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
