नमस्कार मंडळी.
गणपती बाप्पासोबत गेले दहाबारा दिवस कसे गेले, काही कळलेच नाही. या निमित्ताने आपण काही एक लेखमाला, काही वृत्तांत कविताही पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या. आता वाट पाहायची आणि म्हणायचे, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !
विंग कमांडर शशिकांत ओक साहेब यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि साध्या, सोप्या रसाळ भाषेत त्यांच्या हवाई दलातील आठवणी आपल्यासाठी लिहिल्या. या लेख मालेचा गेल्या शुक्रवारी समारोप झाला. पोलादी पडद्याआडच्या काही घटना, प्रसंग, किस्से, माणसांचे चित्र विचित्र स्वभाव, काही हास्यास्पद गोष्टी आपल्याला त्यांच्या या लेख मालेतून कळत गेल्या. या बद्दल सरांचे मनःपूर्वक आभार. लेख माला संपली तरी, त्यांनी यापुढेही लेखन सुरू ठेवावे असे वाटते. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
आता पाहू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
१
सुनील बैकर सरांसारख्या व्यक्ती प्रेरणादायी आहेत.
छान माहिती मिळाली. अशा शाळा.. असे शिक्षक.. किती गरज आहे देशाला !
विज्ञान गणेशाची कथा मोठी रंजक कुतूहल पूर्ण आहे .. मीराताईंनी आणखी रंगवून सांगितली आहे छान
सलोनी यांनी ओळख करून दिलेल्या पुस्तकातील कविता वाचनीय वाटत आहेत.. मंजुळाक्षरे…आपल्या गावातील पाण्याचे देखील कोण कौतुक वाटते कवयित्रीला माजघरातील वाद शक्यतो ओसरीवर न आणू देणे हा पूर्वीच्या स्त्रियांचा स्थायी भाव असावा..त्यांच्या या व्यवच्छेदक लक्षणामुळेच …बुटीबाई ….सारख्या नावांवर देखील लिहीता आले राधिकाताईंना …छान आहे लेख.
गौरी वरील कविता वाचनीय.
श्री अभिषेक,सौ स्नेहल आणि मयुरेश फाटक यांचे किती कौतुक करावे..? शब्दच तोकडे पडतात. आपण त्यांच्याबद्दल माहिती प्रसिद्ध केली, धन्यवाद. खूप सुंदर विचार, प्रस्तुती, अथक मेहनत यासाठी नमन.
मीराताईंनी दिलेली केळझरची माहिती ही छान आहे.
आजच्या विज्ञान युगात संस्कारांची किती गरज आहे , संस्काराची माहिती योग्य शब्दात लिहीली आहे
श्री जाधवजींनी…छान.
मोरया मोरया कविता उत्तम.
— स्वाती वर्तक. मुंबई
२
शिक्षकदिन निमित्ताने दोन्ही रचना समर्पक आहेत.
तसेच अमेरिकेतील गणपती उत्सव हा भारतीय संस्कृतीचा ठेवा जतन करून ठेवला जात आहे. लेखक प्रशांत कोलटकर सरांचे अभिनंदन…
— कवी / लेखक गोविंद पाटील. जळगाव
राधिका भांडारकर यांच्या माझी जडणघडण भाग ६४ (बुटीबाई) वर प्राप्त झालेले अभिप्राय……
१
आठवणींची खोली इतकी असते की त्यांत डोकावले की,
गुरफटून जायला होते !
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे
२
आजच्या जडणघडणीत एक वेगळाच अनुभव वाचायला मिळाला. एकत्र कुटुंबातील जावाजावांचे कधी एकमेकींना धरून राहणे तर कधी मनात काहीतरी आकस ठेवून वागणे अशा गोष्टी आता प्रत्यक्षात तितक्याशा राहिल्या नाहीत. तुझ्या लेखनशैलीत त्या वाचताना मजा वाटली.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
३
खूप छान.
तपशीलात माणूस गुंतूनच पडतो.
सगळं डोळ्यासमोर येतं बुटीबाईंसह..
— सुमती पवार. नाशिक
४
बुटीबाई, नावच इतके चपखल, शब्द चित्र इतके हुबेहुब लिहिलय, सर्व अगदी डोळ्यासमोर उभे राहिले.
— छाया मठकर. पुणे
५
सासुबानी वेळोवेळी सांगितलेल्या एकत्र कुटुंबाबद्दलच्या आठवणी व अनेक व्यक्तींच्या विषयी ऐकून त्याच्यातील काहींना प्रत्यक्ष न बघता ही त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याविषयी आपले मत या लेखात सुरेखपणे माडंले आहे, त्यातल्यात्यात बुटीबाई या व्यक्तीमत्वा विषयी जो विचार व्यक्त केला आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे.
— श्रीकृष्ण भांडारकर. अमळनेर
६
या नुसत्या आठवणी नाहीत.
आठवणींच्या आतल्या थरात डोकावून माणसांना वाचणे यामुळे तू एक समर्थ लेखिका आहेस.
— अंजोर चाफेकर. मुंबई
७
भाग ६३, बैलपोळा —
वाचला. जळगावच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. दरवर्षी ह्यादिवशी होतातच.
आमची पण शेती, मळा होता. आजी – आजोबांना सगळ्याची खूप हौस. तिथे काम करणारे आनंदभाऊ आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यादिवशी आमंत्रण असे. बैलजोडी सजवून ते येत असत. त्यांना आग्रह करुन आई, आजी वाढायच्या. बैलांचं औक्षण व्हायचं. मालदार होते त्यांना नवीन कपडे, भेटवस्तू दिल्या जायच्या. मी आणि माझी बहीण छोटी बैलजोडी घेऊन शेजारी – पाजारी फिरून यायचो. आमचं कौतुक व्हायचं. शाळेत मातृदिन असला की आई यायची म्हणून आनंद व्हायचा खूप.
अनुपमा.
— अनुपमा आंबर्डेकर. मुंबई
८
बिंबा (राधिका) बुटीबाई मस्त.
— संध्या जंगले. मुंबई
९
जडणघडण वाचताना ,तू त्या कुटुंबात एकदम सामावून गेल्यासारखे वाटते. डोळ्यांसमोर, ते मोठं घर, माणसांचा राबता, तुझ्या मनातले अनेक प्रश्न, सर्व काही उभं रहातं. छान लिहिले आहेस
— आरती नचनानी. ठाणे
१०
राधिका
माझी जडणघडण (बुटीबाई) ही आजची कथा मनाला खूप छान पटली खूप सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
— मंगला भांडारकर. अमळनेर
११
राधिका ताई ,
बुटीबाई , छान चरित्र वर्णन… डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या ताई.. खूप छान .
स्त्री मनाला जाणावणाऱ्या कमतरता उणिवा संशोधनाचा विषय आहे.. वाक्य खूप आवडलं.
— मानसी म्हसकर. वडोदरा
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800