महात्मा फुले यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्द सुमने.. महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
नवपिढीस आरोथा
महात्मा फुले कथा
जीवन सार कळता
इप्सितसाध्य सर्वथा
त्या काळीही त्यांना
कळे समाज व्यथा
अंधश्रध्दा शृढरूढी
पायी शृंखला प्रथा
गांजलेली नारीजात
विधवा न् परित्यक्ता
भृण हत्या नेहमीची
ढासळली नितीमत्ता
शाळेची कवाडे बंद
नारी भटके विमुक्ता
शिक्षणज्योत उजळे
पलटून टाकी तख्ता
सावकारी छळवाद
शृंखलाबध्द अशक्ता
मंदीर प्रवेश बंदिस्त
दलीत समाज भक्ता
उच्चनीच जातीज्ञाती
छळे दुर्बला व्यवस्था
सत्य शोधक समाज
मार्गदर्शक बने संस्था
बळीराजा पिडा ग्रस्त
विवेकशून्य अनास्था
कर्जातआकंठ बुडला
ना ईलाज अत्यवस्था
अशावेळी क्रांती सूर्य
नाथ लाभलाअनाथा
इतिहास गाई गोडवे
ध्यानात ठेवी सर्वथा
साथ संगत एकाग्रता
सावित्रीबाई पतिव्रता
बदलूनि टाकले चित्र
कर्तव्यप्रचुर साम्यता
भारतरत्न कधी द्याल
नव पिढी करते पृथा
सन्मान हा पुरस्कारा
का मागणी तरी वृथा

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
