आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने ही विशेष कविता. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
हिंदुस्थान माझा प्राण
वीर आमुचे रणांगणात
हाती घेऊन लढले प्राण
मान तिरंगास गे हृदयात..1
भारताचा गणतंत्र दिन
वाटे आम्हा अभिमान
जागवी देशभक्ती मनी
लाभतसे हो समाधान.. 2
संत वीर यांची जन्मभूमी
बनले आता हे तीर्थस्थान
पसरे दुरवर देशाची महती
कितीदा गावेत गुणगान.. 3
हिंदुस्थान माझा असे प्राण
यश किर्ती उंचवू या मान
शान आणि आण व बाण
लोकतंत्राचे ठेवू या भान. 4
उत्तम अपूर्व वारसा दैदिप्य
लाभला आहे या देशाला
सर्व ठिकाणी क्रांती घडवे
प्रगती पथावर दिसे जगाला.. 5

— रचना : सौ मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️91 9869484800
