पाचगणी शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनामध्ये पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद व नेस्ले समर्थित हिलदारी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन विषयावरील थीम फ्लोट सादर करण्यात आला.
पाचगणीमध्ये प्रथमच कचरा व्यवस्थापन व सफाई कर्मचाऱ्यांवर आधारित असा जनजागृतीपर फ्लोट सादर करण्यात आल्याने नागरिक व पर्यटकांचे लक्ष वेधले गेले.
या फ्लोटमध्ये “Not all heroes wear capes, some keep Panchgani clean everyday” या संदेशातून स्वच्छता कर्मचारी हेच खरे नायक असल्याचे दाखवण्यात आले. तसेच ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक व बायोमेडिकल कचरा यांचे वर्गीकरण प्रत्यक्ष स्वरूपात मांडण्यात आले. “आपला कचरा – आपली जबाबदारी” या संदेशामुळे स्वच्छतेबाबत वैयक्तिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली.

फ्लोटचे उद्घाटन पाचगणीचे नगराध्यक्ष मा. श्री. दिलीप भाऊ बगाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपनगराध्यक्ष मा.श्री. प्रकाश गोळे, नगरसेवक श्री शेखर कासुर्डे, नगरसेवक श्री राजेंद्र पार्टे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. पंडित पाटील, पालिकेचे अधिकारी- कर्मचारी, हिलदारीचे डॉ. मुकेश कुळकर्णी व टीम उपस्थित होती.
नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले की, हा उपक्रम केवळ प्रजासत्ताक दिनापुरता मर्यादित नसून, हिलदारी अभियानाच्या सहकार्याने ‘माझी वसुंधरा’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत कचरा विलगीकरण व स्वच्छतेबाबत सातत्याने जनजागृती व सफाई मित्रांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे शहरात शाश्वत स्वच्छता व्यवस्थापनाला चालना मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत “स्वच्छ पाचगणी – सुंदर पाचगणी” या संकल्पनेला पाठिंबा दर्शविला.
— टीम एन एस टी. ☎️ +91 9869484800

प्रजासत्ताक दिनानिमित्त पाचगणी येथे राबवलेला अनुकरणीय उपक्रम.
Thank you sir