निर्धास्त, बेधडक अन
तितकाच दिलखुलास
ज्या माणसास लाखो
हृदयात स्थान खास
बारामती सुपुत्र
अनमोल कोहिनूर
वाटे हवाहवासा
गेला निघोनी दूर
अघटीत फार झाले
नव्हतीच योग्य वेळ
नियती क्षणात गेली
खेळून क्रूर खेळ
बहिणी अनाथ झाल्या
नाहीच घाव साधा
का घेतला हिरावून
प्रभू सांग आज दादा
अद्भुत कार्यशैली
जनहित हेच लक्ष्य
जो संकटात त्याचा
कधी पाहिला न पक्ष
भरघोस कार्य केले
शिक्षण, कृषी नि अर्थ
ते योगदान कधीही
जाणार नाही व्यर्थ
पण सांगतो तरीही
केलीत खूप घाई
महाराष्ट्र म्हणे दादा
ही वेळ योग्य नाही
शब्दास जागणारा
करणार पूर्ण वादा
अर्ध्यात का परतले
सांगा तुम्हीच दादा ?
— रचना : मुरारी देशपांडे. संगमनेर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
