“टिंब”
मंडळी,
वासिली कांडिन्स्की यांचे Upwards (1929) हे एक विलक्षण चित्र आहे. या चित्रातील भौमितिक आकृती चंद्र आणि सूर्य यांचे एकत्रित रूप दाखवते. चंद्राचा उधार घेतलेला प्रकाश की सूर्याचा स्वतःचा स्रोत—या दोहोंमधील फरक ठामपणे ठरवता येत नाही कारण तो मुद्दाम अपूर्ण ठेवलेला आहे.
चित्रामध्ये दिसणारं काळं टिंब—black dot—हा नेमका कोणाची दृष्टी दर्शवतो ? चंद्राची, सूर्याची, का तो पाहणाऱ्याचाच दृष्टीकोन दर्शवतो ? हा प्रश्न चित्रात अनुत्तरीत राहतो आणि तीच या चित्राची ताकद आहे.

चित्रातील चंद्र–सूर्याचा डोलारा ज्या अर्धवट भौमितिक रचनेवर विसावलेला आहे, ती एका बाजूने घरासारखी भासते, तर दुसऱ्या बाजूने गिरणीसारखी. घर की गिरणी—हे द्वंद्व केवळ रचनात्मक नाही, तर तो आयुष्य आणि करिअर, जबाबदारी आणि स्वप्न, घर आणि काम यांच्या मधल्या ताणाचा व्यापक स्पेस मांडतो.
मग प्रश्न उरतो की, आपण जे यश म्हणून पाहतो, ते खरोखरच स्वतःच्या प्रकाशाचा स्रोत आहे का, की केवळ एखाद्या प्रतिबिंबाचा भास ? आणि या प्रश्नाचं उत्तर—मला वाटतं—आजवर कोणालाच पूर्णपणे मिळालेलं नाही. ह्याच विचारांनी प्रेरित अशी ही कविता – टिंब.
यूट्यूब चॅनलची लिंक इथे खाली देत आहे.
मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.

— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
