इतकेही दुबळे होऊ नाही की;
कुणीही तोडून टाकावं,
इतकेही नतमस्तक होऊ नाही की;
कुणीही लाथाडावं.
दुसऱ्याशी ईर्षा करून;
आपली किंमत कमी करू नये,
इतरांचे अंधानुकरण करून;
अधोगतीकडे वळू नये.
आंधळे प्रेम करून;
चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालू नये,
पुण्य करणे नाही जमले तरी;
पापाचे धनी होऊ नये.
जीवाला जीव लावणाऱ्याला;
जगणे नकोसे करू नये
नाही मान राखता आला
तरी अवमान मात्र करू नये.
कोणाच्या सुखाचे निमित्त होता आले नाही तरी;
दुःखाचे कारण बनू नये,
कुठलेही नाते तुटून पडेल;
इतकेही ताणू नये.
प्रेम ओरबाडून मिळत नसते;
ते मिळविण्यासाठी नात्याच्या परीक्षेस उतरावे लागते.
खऱ्या प्रेमाचा कस लागतो;
कदर नसणाऱ्याला खरे प्रेम कधीच मिळत नसते.
माणसांना तोडून नाती संपत नाहीत.
वास्तवाचा त्रयस्थपणे विचार न करणाऱ्या व्यक्तीशी
संवाद होऊच शकत नाही.

— रचना : योगिनी चेतन पंडित. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
