नमस्कार, मंडळी.
मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, आरोग्य, विकास, यशोगाथा विश्व बंधुत्व यासाठी प्रयत्नशील राहणार्या ‘न्यूज स्टोरी टुडे’ या आपल्या वेब पोर्टलचा संपादक म्हणुन माझा आणि निर्माती म्हणुन सौ अलकाचा या पूर्वी विविध ठिकाणी, विविध संस्थांनी सत्कार केला आहे. गेल्या आठवडय़ात आमचे तीन वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार करण्यात आले. त्यातील दोन सत्कार घरचेच असल्यामुळे खूपच आनंद देऊन गेले.

विश्वभरारी फाऊंडेशन आणि नॅशनल लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने 24 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक सांस्कृतिक कार्यमंत्री श्री आशिष शेलार यांच्याहस्ते, स्वागताध्यक्ष आमदार श्री पराग गुळवणी, संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक श्री किरण येळे, जेष्ठ लेखिका रेखाताई नार्वेकर आणि आयोजिका लता गुठे आदींच्या प्रमुख उपस्थितीत माझा सुंदर स्मृतिचिन्ह सन्मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तर प्रजासत्ताकदिनी; 26 जानेवारी 2026 रोजी आमच्या मिलेनियम टॉवर्स सह्याद्री गृहनिर्माण संस्थेच्यावतीने सचिव श्री सुनील पाटील यांच्याहस्ते इतिहासकार विजय आपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आम्हा उभयतांचा छानसे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

तर 31 जानेवारी 2026 रोजी आम्ही सदस्य असलेल्या सानपाडा जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आनंद मेळाव्यात राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलीस अधिकारी श्री बाबासाहेब ढाकणे यांच्याहस्ते आणि संघाचे अध्यक्ष श्री मारुती विश्वासराव आणि अन्य पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आम्हा उभयतांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

ठिकठिकाणी होणार्या सत्कारांनी आनंद होतो आणि अधिक काम करण्याचा हुरूप वाढतो, हे खरेच पण आपण रहात असलेल्या सोसायटीच्या लोकांनी आणि सदस्य असलेल्या जेष्ठ नागरिक संघाने लागोपाठ केलेल्या सत्कारांनी झालेला आनंद काही औरच ! या दोन्ही संस्थांचे आणि या पूर्वीही सत्कार केलेल्या सर्व संस्थांचे, व्यक्तींचे मनःपूर्वक आभार. आपला लोभ आहेच, तो असाच कायम असू द्या.
आपल्या सर्वांना आनंदी आणि आरोग्यदायी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.
आपले स्नेहांकित,
— संपादक : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
