Homeसाहित्य"चवदार तळ्याचे पाणी"

“चवदार तळ्याचे पाणी”

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्या निमित्ताने ही कविता. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
— संपादक

बाबासाहेब तुम्ही होता म्हणुन
चवदार तळ्याचे पाणी मिळाले
दीन दलितांचे हक्क त्यांना
तुमच्यामुळेच तर मिळाले ॥ १ ॥

पाणी म्हणजे जीवन आहे
दीन दलितांना ते मिळत नव्हते
हक्क त्यांचा हिरावला होता
बाबासाहेब तुमच्यामुळे पाणी मुक्त झाले ॥ २ ॥

चवदार तळ्याचा सत्याग्रह
स्वाभिमान अन अस्मितेचा
गोरगरिबाला पाणी मिळाले
इतिहास झाला सत्याग्रहाचा ॥३॥

बाबासाहेब तुम्ही होतात
म्हणुन झाला हा लढा
मुक्त झाले अंगण दीनदुबळांचे
सत्याग्रहाचा हा यशस्वी लढा ॥ ४ ॥

प्रज्ञा शिल करुणेचा सागर तुम्ही
चवदार तळ्याचे सत्याग्रही तुम्ही
मानवते पुजारी आणि मानवतावादी तुम्ही
दीनदुबळे दलितांचे उध्दारक तुम्ही ॥ ५ ॥

पाण्यावर हक्क ना कोणाचा
सर्वांसाठी ते खुले असावे
चवदार तळ्यांवर सत्याग्रह
संघर्ष शिकवला दिनदलितांना

कल..पंकज काटकर

— रचना : पंकज काटकर.

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६