Homeसाहित्यपाऊस गाणे

पाऊस गाणे

आला आला रे पाऊस आला
बळी राजास आनंद झाला ll ध्रु ll

मेघराजे कृपा केली वर्षा राणी वर्षली,
धरा झाली ओली झाडे झुडपे थरथरली ll
थेंबाने शोभली हर्षे डूलू लागली ll
चला त्वरे जाऊ भिजनीया घेऊ,
मन मोर मुदे नाचला
बळी राजास आनंद झाला ll१ll

पेरा होईल आता कष्टे अन्नदाता अंकुरेल बीज ll
क्षणोक्षणी आशा पुरवील मनिषा,
काळी आई सहज अधिक पिकेल धान्य,
दूर होईल दैन्य, दुवा मागे तो ईश्वराला
बळीराजास आनंद झाला ll२ll

धरणे नद्या भरू दे, पाणी साठा होऊ दे,
जगण्या चराचराला, हवा तसाच बरस मेघा ll
नको करू उगा त्रागा विनंती असे तुजला,
आता काळी आई हिरवा शालू लेई,
देई आनंद साऱ्या जगाला
बळीराजास आनंद झाला ll३ll

— रचना : अलका मोहोळकर. पंढरपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments