Homeसाहित्यदेवा, असा कसा रे तू ?

देवा, असा कसा रे तू ?

साद घालते कोकीळा
मोठ्या सकाळी सकाळी
गोड आवाजात तिच्या
जशी गाते ती भुपाळी !!

सुरू असते कुहूकुहू
आजुबाजुच्या बागेत
मोठे प्रसन्न वाटते
सा-या आसमंतात !!

निसर्गाच्या किमयेची
हीच भारी वाटे लिला
गोड आवाजाचा कंठ
देवानेच तिला दिला !!

काळ्या-तांबड्या रूपाला
हेची ईश्वराचे वरदान
ज्याला मिळते भाग्याने
तोही देतो भरभरून !!

मयुराच्या नशिबाने
मिळे रूपडे सुंदर
कशी काय चूक झाली
त्याचे पाय काळेभोर !!

देवा असा कसा रे तू ?
एक रंक, एक राव
सुख दुःखही बेजोड
का करसी दुजाभाव
का करसी दुजाभाव !!

राजाराम जाधव

— रचना : राजाराम जाधव.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments