असाही पाऊस पडत होता
पेटीवरच्या सूरांचा नाद होता
ओठावर मधुर स्वर होता
लय आणि तालावर साज होता
प्रेमीजनांचा सखा होता
आतूर नजरेचा संवाद होता
ओठावरती मौन होता
टपोरा थेंब पडत होता
हृदयी गुज बरसत होता
असाही पाऊस पडत होता
पाऊस थेंबांचा गजरा होता
केसावरती ओघळत होता
ओठास महिरिपी कंस होता
प्रेमाच्या हाकेस होकार होता
असाही पाऊस पडत होता
असाही पाऊस पडत होता
– रचना : अंजुषा