गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. त्यांचे सुमधुर सूर सदैव जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात. त्यांना निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा आणि या काव्यरूपी शुभेच्छा.💐
श्वासातला सा हृदयात जिच्या ती लता
ओठांतली वाऽऽ साद देई जिला ती लता
धाकात सारे सूर वेगळाच तरी नूर
भक्तीचा पूर स्वरा जिच्या ती लता
देवळात पडक्या भक्त झुकवी माथा
भेटे देव दूरस्थ आर्तात जिच्या ती लता
ऐकण्या गंधार तान तान्हेले आभाळ
सूर्यही आसुसला दर्शन जिच्या ती लता
स्वर्गीय सप्तकात विराजे आठवा सूर
डोले धिंऽधा लयीत जिच्या ती लता
आरोह ऐकुनि ईश्वरा लाभली एकाग्रता
सूरमाला अर्पिली गळा जिच्या ती लता
– रचना : सुधीर शालीनी ब्रह्मे