Sunday, July 6, 2025
Homeपर्यटननवी मुंबईत एब्सोल्यूट बारबेक्यू

नवी मुंबईत एब्सोल्यूट बारबेक्यू

अग्रगण्य बारबेक्यू रेस्टॉरंट चेन, एब्सोल्यूट बारबेक्यू (AB’s) ने आज आपले ४५ वे रेस्टॉरंट उघडले असून पवईनंतर आता वाशीमध्ये आपला विस्तार केला आहे.

वाशीमधील एब्सोल्यूट बारबेक्यूमध्ये १२० अतिथी आसन क्षमता आहे .कोणत्याही खास सेलिब्रेशनसाठी रेस्टॉरंटला बुक करता येईल. एबीमध्ये वाढदिवस आणि अॅनिव्हरसरी साजरी करण्याची अनोखी पद्धत आहे ज्यामुळे हे ठिकाण नेहमीच गजबजलेले असते.

२०१३ मध्ये सुरू झालेला एबी, बारबेक्यूच्या जगातील अगोदरचाच एक प्रसिद्ध ब्रँड आहे आणि भारतातील १९ शहरांमध्ये तो पोहचला आहे. कंपनीमार्फत दुबईमध्ये देखील दोन रेस्टॉरंट चालवली जातात.

कंपनीचे सीईओ ऑपरेशन्स आशिष राय यावेळी बोलतांना म्हणाले की, “आम्ही नेहमी हाच प्रयत्न करतो की आमच्या ग्राहकापर्यंत पोहचू. बर्‍याच काळापासुन वाशी आमच्या नजरेत होती. या भागातून आमच्याकडे नेहमी चौकशी येत होती. पवईमध्ये आम्हाला यश आल्यानंतर वाशी पाम बीच रोडवरील पाम बीच गॅलेरिया मॉलमध्ये आल्याचा आता आम्हाला आनंद होत आहे. मला खात्री आहे की, दर्जेदार खाद्यपदार्थ आणि उत्कुष्ट सेवांमुळे आम्ही लवकरच शहरातील सर्वाधिक मागणी असलेले बारबेक्यू रेस्टॉरंट बनू.”

एबीच्या सर्व रेस्टॉरंटमध्ये सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे, स्वच्छतेचे पालन होते. येथे सर्व रेस्टॉरंट कर्मचार्यांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. येथे ग्राहकांशी व्यवहार करताना सर्व सुरक्षा उपायांचे पालन केले जाते.

एब्सोल्यूट बारबेक्यूला केवळ ग्राहकांचीच काळजी नाही तर सामाजिक जबाबदारीचे देखील भान आहे. ते सामाजिक जाणिवेतुन कार्य करण्यासाठी देखील प्रयत्नशील आहे.

ब्रँडने ने आपल्या ४५ व्या आऊटलेटच्या प्रारंभाच्या वेळी, “रेज ऑफ होप मिनिस्ट्रीज” या मानवतावादी स्वयंसेवी संस्थेसोबत हातमिळवणी केली आहे, ज्यांचा दृष्टीकोण आणि ध्येय निराशाजनक जीवनात आशा आणणे, गरजूंसाठी काम करणे आणि गरीबांच्या कल्याणासाठी बदल घडवून आणणे हे आहे.

गरजू, दुर्लक्षित, वंचित अशी रेज ऑफ होप मिनिस्ट्रीज एनजीओ मधील सुमारे २५-३० मुले लॉन्च दरम्यान येथे आली. एबीच्या संपूर्ण वरिष्ठ व्यवस्थापन आणि टीमने मुलांबरोबर चांगला वेळ घालवला. ही स्वयंसेवी संस्था रस्त्यावर/झोपडपट्टीतील मुलांपर्यंत पोहोचणे, अनाथांना आश्रय देणे, सेक्स वर्कर्स आणि त्यांच्या निष्पाप मुलांची सेवा करणे, विधवांची काळजी घेणे, एचआयव्ही पॉझिटिव्ह उद्ध्वस्त कुटुंबाची काळजी घेणे यात गुंतलेली आहे.

एब्सोल्यूट बारबेक्यू त्यांच्या अनोख्या ‘विश ग्रिल’ संकल्पनेसाठी प्रसिद्ध आहे जी आपल्या ग्राहकांना स्वतःचे (डीआयवाय) अनुभव प्रदान करते.

या प्रसंगी रेस्टॉरंटचे विक्री आणि विपणन विभागाचे डीजीएम शुभम कुमार शुक्ला यांचीही उपस्थिती होती.

– लेखन : शेषराव वानखेडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments