एस्.व्ही.एस्.कला प्रतिष्ठान, नवी मुंबई यांच्या वतीने २००८ पासून समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या घरी जाऊन, स्थानिक सन्माननीय व्यक्तीच्या हस्ते अनौपचारिक पध्दतीने पुरस्कार प्रदान केला जातो.
यावर्षीच्या या पुरस्कारासाठी प्रतिष्ठानने प्रा.बाळासाहेब पाटील, सांगली यांची निवड केली आहे. कलापुष्पच्या माध्यमातून दृश्य कलाक्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक म्हणून हा पुरस्कार रविवारी कोल्हापूर येथे ज्येष्ठ चित्रकार प्राचार्य जी. एस. माजगावकर यांच्या हस्ते
सन्मानपूर्वक दिला. अनौपचारिक व निवडक स्नेह्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास ज्येष्ठ चित्रकार प्राचार्य जी. एस. माजगावकर कोल्हापूर, ज्येष्ठ चित्रकार प्रा. सुरेश पंडित सांगली, ज्येष्ठ शिल्पकार संजय तडसरकर कोल्हापूर, चित्रकार संजय शेलार कोल्हापूर, प्राचार्य अजेय दळवी कोल्हापूर, प्रा. शामराव पाटील (चेअरमन : राजारामबापू सहकारी बँक), प्राचार्य प्रदीप पाटील इस्लामपूर, प्रा. वैशाली पाटील कोल्हापूर, प्रा. डॉ. सागर बोराडे जयसिंगपूर, चित्रकार नागेश हंकारे कोल्हापूर, श्री शामराव जगताप सांगली, श्री रमेश मगदूम सांगली, चित्रकार गजानन धुमाळ कोल्हापूर, प्रा. संदीप पोपेरे कोल्हापूर, श्री सुरेश चौगुले, कोल्हापूर
निमंत्रक प्रा गजानन शेपाळ व सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील निवडक कलावंत, कलारसिक उपस्थित होते.
– टीम एनएसटी. 9869484800