अथांग

दुभाजकाचे पत्थर करिती
चिंता अपुली, अन् विश्वाची
आशा आकांक्षेविन त्यांची
जागेवर आयुष्ये विरती

स्वास्थ्य- सुखातिल खुरटे जगणे
गंजावत गेलेले जीवन !
कळतच नाही अयुष्यावर
कुठले असते हे संमोहन ?

स्थितिप्रियांच्या संथ मनांतहि
कधी अचानक तरंग उठती
आकांक्षांचे पक्षी जागत
वादळ होउन उडू लागती

दिशाबंध लंघून अनोख्या
अवकाशातिल अशी भ्रमंती
अपूर्व जाणिव उत्साहाने
विस्तारत नेते ही दृष्टी

शोधत वाटा नव्या नि द्वारे-
उघडत जाती नित्य नवनवी
जित्या जागत्या तरुणाईला
फुटू लागते नवी पालवी

काळालाही कवेत घेउन
जिणे प्रवाहित ऐसे व्हावे
अभेद्य भेदत, वळसे घेउन
अथांगात त्या विलीन व्हावे

— रचना : सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr. Surekha Vivek Joshi on माझी जीवन नौका : 2
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : 2
प्रज्ञा आठल्ये on “आशा भोसले”
निलकंठ घिवारे on माझी जीवन नौका : 2
निलकंठ घिवारे on माझी जीवन नौका : 1
कांचन दळवी on माझी जीवन नौका : 2
राघवेंद्र कुलकर्णी on माझी जीवन नौका : 2