Homeसाहित्यअभिजात भाषा मराठी…

अभिजात भाषा मराठी…

पिढ्या दर पिढ्यांनी जपावी मराठी
अशी अंतराळी भिडावी मराठी

तिचे गीत भारुड गझल लावणी ही
जगी उंच स्थानी रहावी मराठी

कला वैभवाचा सुगंधी खजाना
मनी दरवळावी फुलावी मराठी

तिच्या थोरवीचा अलंकार बाणा
सदा अंतरंगी मुरावी मराठी

अभिजात आहेच भाषा मराठी
लिहावी रुजावी उरावी मराठी

तिची गोड वाणी जगाला कळावी
सदा काळजावर वसावी मराठी

मराठी शिकाया विनवते ‘अनीसा’
चहू या दिशांना फिरावी मराठी

प्रा.अनिसा सिकंदर

— रचना : अनिसा सिकंदर. दौड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अभिजात हा दर्जा प्राप्त झाल्यानंतरचा एका मराठी माणसाचा आनंद आणि अभिमान व्यक्त करणारे खरे अभिमानगीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments