Homeयशकथा"शब्दांच्या वाटेवर" : देवेंद्र भुजबळ

“शब्दांच्या वाटेवर” : देवेंद्र भुजबळ

मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनी वर “शब्दांच्या वाटेवर” या कार्यक्रमात सोमवारी रात्री 8.30 वाजता आणि पुन्हा मंगळवारी दुपारी 2.30 वाजता आपल्या पोर्टलचे संपादक- लेखक श्री देवेंद्र भुजबळ यांची मुलाखत प्रसारीत झाली.

मुलाखतकार पूनम चांदोरकर यांनी चांगले प्रश्न काढले होते. त्यामुळे श्री भुजबळ यांना वाचनाची आवड कशी लागली, शब्दांच्या वाटेवर ते कसे वळले, लिखाणामागची त्यांची प्रेरणा, www.newsstorytoday.com या पोर्टलची निर्मिती, पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या लेखमाला पुस्तक रुपात कशा प्रकाशित झाल्या, अन्य पुस्तकांचे संपादन, प्रकाशन अशी खूप छान मुलाखत झाली आहे.

ही मुलाखत आम्हाला पाहता न आल्याने मुलाखतीची लिंक उपलब्ध करून दिल्यास बरे होईल, असे अनेक जणांनी कळविले आहे. सुदैवाने दूरदर्शन ने देखील ही लिंक उपलब्ध करून दिल्याने ती पुढे देत आहे.

ही मुलाखत पाहून आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यास आनंद होईल.

केंद्र प्रमुख श्री राजेश दळवी, निर्माते श्री दीपक शर्मा, सहायक निर्माते श्री संजय झनके, अन्य तंत्रज्ञ, सहकारी आणि मुलाखतकार पूनम चांदोरकर आणि मुलाखत पाहून भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार.

— टीम एन एस टी. ☎️+ 91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on खरा डॉक्टर
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on प्राणांचे झुंबर…