नकलांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे प्रसिद्ध नकलाकार हरिभाऊ बेलुरकर (वय ८९ वर्षे) यांच्या “पारबते आपलं कसं ?” आणि “कलामहर्षी” या दोन पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच चित्रकार, लेखक श्री विजयराज बोधनकर यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरू संतश्रेष्ठ आडकुजी महाराज यांच्या अमरावती जवळच्या वरखेड या गावी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार तथा माजी कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे होते.
यावेळी बोलताना श्री बोधनकर म्हणाले की, हरिभाउंनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्यान समाज कार्याचा झेंडा आयुष्यभर समाज सेवेसाठी वापरला. नकलेतून समाज प्रबोधन करण्याचे व्रत त्यांनी आयुष्यभर जोपासून समाजाला अज्ञापासून दूर करण्याचा मोठा प्रयत्न केला. त्यांचे ज्येष्ठ बंधू रामकृष्ण दादा बेलुरकर यांनीसुद्धा ग्रामगीतेचा प्रसार केला. त्यांनी ही अनेक ग्रंथ लिहिले, व्याख्याने दिली. ग्राम सुधार व्हावा म्हणून गावोगावी भिंतींवर ग्रामगीते मधल्या ओव्या लिहून ग्राम सुधारणा केली. यातून त्यांनी कुठलीही आर्थिक प्राप्ती मिळविली नाही तर अर्थकारणाचा त्याग करून आयुष्यभर सेवाभावी वृत्ती जपली. हरिभाऊ बेलुरकर यांनी स्वतः वेगळ्या नाटिका लिहून व स्वतःच वेशभूषा करून नकलेच्या द्वारे आयुष्यभर लोकांचे मनोरंजनातून ज्ञानरंजन केले. दारू, अंधश्रद्धा, शिक्षण, शेती, बेरोजगारी यावर नकळत आपल्या स्वलिखित नकलेतून हसवता हसवता जनजागृती केली. हे खरोखरीच मोठे कार्य मी समजतो.निस्वार्थ वृत्तीने समाजकार्य करायला मोहाचा त्याग करावा लागतो आणि तो त्याग राष्ट्रसंत यांच्या ग्रामगीतेने त्यांना शिकवला. अशा व्यक्तीच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्याची मला संधी मिळाली.
यावेळी हरिभाऊ आणि त्याच्या पत्नीचा डॉ अनिल बोंडे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. हरिभाऊ बेलुरकर यांना दिलेल्या सन्मानपत्राचे यावेळी वाचन करण्यात आले.
या सोहळ्यास पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ श्री शरदराव निंबाळकर उपस्थित होते. राष्ट्रसंतांचे खाजगी सचिव, प्रमुख मार्गदर्शक श्री जनार्दन बोथे गुरूजी, ज्येष्ठ चित्रकार श्री गजानन आंबूलकर गुरूजी, (सेवाग्राम आश्रम)
उपस्थित होते.
माणिक प्रकाशनाचे सर्वेसर्वा माणिक दादा बेलुरकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मंडळींची मोठी प्रमा या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक बेलुरकर यांनी, सुत्रसंचलन श्री दिलीप मोहेकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.कार्तिक माणिक बेलूरकर यांनी केले.
यावेळी नागपूर येथील हौशी उच्च विभूषित मंडळींनी “नक्षत्र” हा कार्यक्रम सादर केला. त्या कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी, सावित्रीबाई फुले, राम गणेश गडकरी, इंदिरा संत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अशा अनेक विभुतींच्या नाट्य संहितेचे वेशभूषेसह सादरीकरण केले.त्याला ही रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
मनःपूर्वक अभिनंदन..!!
समाज प्रबोधन करत आयुष्य सफल केलेल्या ह्या ८९ वर्षांच्या चिरतरुणाला सादर नमस्कार! त्यांची पुस्तके नक्कीच उच्च दर्जाची आणि सामाजिक मूल्ये जोपासणारी असणार! त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या पुस्तक-लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐