पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्दांजली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
१. अहिल्याई
मध्ययुगी चमत्कार
होळकर अहिल्याई
कार्यक्षम राज्यकर्त्यां
असूनही एक बाई
चाणाक्ष दूरदृष्टीची
माहेश्वर साक्ष देई
रयत सुखात सदैव
दगडही गोडवे गाई
तळेविहीर पाणपोई
सुधारणा ठाई ठाई
कलात्मक मंदिरे ती
भक्तीची देते ग्वाही
शत्रुभिल्ल शांत राही
तलवारीची गं धिटाई
मन तितके मुलायम
ओठी नांदते मिठाई
बळीराजा समाधानी
कास्तकार घासखाई
अमोल वस्त्र शिलाई
घरोघरी सूत कताई
उपकृत करी पिढ्या
उपकारा ना उतराई
बहुगुणांची बहरलेली
जणूं रसाळ आमराई
न्याय प्रिय तत्वज्ञानी
इतिहासही गुण गाई
विरळा अशी सम्राज्ञी
लीन आम्ही तव पाई
२. माहेश्वर स्वर्ग..
नर्मदेच्या तीरावर
डौलदार माहेश्वर
जाणवे जाता तिथे
अहिल्याईचा वावर
होळकर महालात
संग्रालय ते मनोहर
जाणून उमजून घे
चरित्र समग्र थोर
भव्य उत्तुंग पुतळा
सहज झुकते शिर
राजवाडा दगडाचा
कला कुसर सुंदर
कलेचा आविष्कार
अद् भूत चमत्कार
मग जायचे दर्शना
जलेश्वरअहिल्येश्वर
कदंबेश्वर कालेश्वर
नदीपात्री बाणेश्वर
श्रीहरी राजराजेश्वर
दीप तेवती निरंतर
सोडताना माहेश्वर
येई अति जीवावर
स्थान छान खरोखर
जाऊ वाटे वारंवार
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800