१. देश…
जगाला ज्याने दिलेत,
संस्कृतीचे धडे,
आणि शिकवलय,
शून्याचे कोडे,
तो चार हात करतो,
जो त्याला नडे,
जगाचे लक्ष,
त्या माझ्या महान भारताकडे !
२. सैनिक….
छातीची ढाल करूनी,
उभा असे तो सीमेवरी
तहान, भूक, घरदार,
आपल्यासाठी जो विसरी
लढतांना जो,
स्वत:च्या जिवाची, पर्वा न करी
त्या सैनिकाला प्रणाम,
पूरी भारत जनता करी !
३. देशभक्ती ……
मी बांधील …
माझ्या देशासाठी,
स्वतंत्र देशाच्या,
स्वच्छ प्रतिमेसाठी…
नियमांत राहून,
कर्तव्य करण्यासाठी
सच्च्या देश प्रेमाने,
देश सेवा करण्यासाठी….
— रचना : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— अलका भुजबळ. ☎️ 9869484800