Homeसाहित्यध्यास निळा….

ध्यास निळा….

(द्विपदी).

ध्यास लागला तिला शामरंगाचा,
झोपेतही तिला भास होई निळ्या रंगाचा.

आभाळाचा तुकडा दिसे निळा,
रंगही वाटे शांत सागराचा निळा.

निळ्या क्षितिजावर चांदवाही निळा,
भर ऊन्हातही प्रकाश भासे निळा.

जलाशयी मासोळी चमके निळी,
वेलींवरती फुलेही ऊमलती निळी.

चकवाच मनाला तिच्या लागला निळा,
आंसही निळीच अन् ध्यासही निळा.

झोपेतले स्वप्नही निळे,
सारे विश्वची रंगले निळे.

मन रंगले निळ्या शामरंगात,
तन आसुसले निळ्या शामगंधात.

ती शोधते तिला बाधा शामरंगाची,
अंतरी ओढ सतत घननिळाची.

होते तगमग परि घननीळ दिसेना,
ध्यास तुझा मग विश्व का घननीळ कळेना.

— रचना : अनुराधा जोशी. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

Previous article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments