3 अलक …

१) लाखो भक्तागणासह ती स्नान करीत होती. नदीत सोडलेले लक्ष दीप अंतरीचे कोटी भक्तीदीप उजळत होते. परब्रम्ह मूर्ती मनी साठवून नंतर देवदर्शन, नगर प्रदक्षिणा, भजन कीर्तनाचे श्रवण करून अधिक मासाचे पुण्य पदरी घेत ती धन्य धन्य झाली.

२) सगळ्या मालकिणीसाठी तिने पेढा बॉक्स घेतले. प्रत्येक घरचे धुणेभांडी, पोछाझाडू होताच मालकिणींना पेढा बॉक्स देत नमस्कार केला. मालकिणीही तिचे हसून अभिनंदन करीत होत्या. कारण तिची लेक डॉक्टर झाली होती !!

३) त्याच्यासाठी ते रात्रीचा दिवस करून कष्टले. स्वतःची हौस मौज टाळून त्यास परदेशी शिक्षणास पाठवले. दोनाचे चार हात केले. पण आता तो तिथेच रमला आणि जीवन संध्येला ते नकोसे एकाकी त्याची वाट पहात जीवन जगताहेत !

— लेखन : श्रीमती अलका रामचंद्र मोहोळकर. पंढरपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments