श्री गज आनन म्हात्रे लिखित, “चक्रीवादळातील श्री संत रामदास बोट” या थरारक कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका प्रा.प्रतिभा सराफ यांच्याहस्ते नुकतेच नवी मुंबईत झाले.
यावेळी बोलताना प्रा.प्रतिभा सराफ म्हणाल्या की, गज आनन म्हात्रे यांनी 77 वर्षापूर्वी समुद्री चक्रीवादळात बुडालेल्या रामदास बोटीवर वाचनीय कादंबरी लिहून साहित्य क्षेत्रात मोलाची भर टाकली आहे. या कादंबरीत तत्कालीन लोकजीवन, संस्कृती, भूगोल, ईतिहास सहजतेने आला आहे. या कादंबरीवर चांगला चित्रपट होऊ शकेल, असे सूतोवाच ही त्यांनी केले.

प्रा.अजित मगदुम यांनी या थरारक कादंबरीचा इंग्रजी अनुवाद करण्याचा मनोदय व्यक्त करून ‘गज आनन म्हात्रे’ हा एक झपाटलेला लेखक असून तो अभ्यासपूर्ण पुस्तके लिहीतो, त्यास साहित्य क्षेत्रात उदंड यश मिळेल असे सांगितले.
प्रा.एल.बी.पाटील यांनी म्हात्रे हे भटकंती करून, निसर्ग- लोकजीवन पाहून लेखण करतात. ते आपल्याच मनातले लिहितात असे प्रतिपादन केले.
ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ चे अध्यक्ष अरविंद वाळवेकर म्हणाले, मी गज आनन म्हात्रे यांच्या पुस्तकांचा वाचक आहे. वाचकास खिळवून ठेवण्याची क्षमता त्यांच्या लिखाणात आहे.

श्री गज आणण म्हात्रे हे न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे लेखक, कवी असल्याबद्दल पोर्टल च्या पद्धतीनुसार पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी त्यांना न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चा मग भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मंगळा उदामळे यांनी केले.

या कार्यक्रमास विविध मान्यवर, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
भुजबळ सर, आपण संपूर्ण कार्यक्रमाचे समग्र विश्लेषण केले आहे.
धन्यवाद