Homeबातम्यासानपाडा : कॅरमचा डबल धमाका !

सानपाडा : कॅरमचा डबल धमाका !

नवी मुंबईतील सानपाडा जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात आठवडा चाललेल्या पुरुष व महिला एकेरी कॅरम स्पर्धा काल मोठ्या उत्साहात पार पडल्या.

पुरुष गट : अंतिम सामन्यात श्री गजानन लोखंडे ऊर्फ गजाभाऊ यांनी श्री दिलीप भागवत यांच्यावर मात करत विजेतेपद पटकावले. श्री दिलीप भागवत उपविजेते ठरले. उपांत्य फेरीत श्री मधुसूदन जोशी व श्री रमेश कोलगे पराभूत झाले.

महिला गट : दिनांक 21 मे रोजी झालेल्या अंतिम सामन्यात श्रीमती शालन देशमुख यांनी विजय मिळवला, तर सौ. विमल व्हटकर उपविजेत्या ठरल्या. या महिला स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे विरंगुळा केंद्रातील ही पहिलीच महिला कॅरम स्पर्धा होती. सौ. आशा कुलकर्णी, कॅरम खेळाडू यांनी प्रास्ताविक करताना हा “सुवर्णक्षण” असल्याची भावना व्यक्त केली.

बक्षीस वितरण समारंभास सर्वश्री मारुती कदम, बळवंत पाटील, जे.पी. देसाई, एकावडे उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते विजेता, उपविजेता व उपांत्य फेरीतील खेळाडूंना गौरवण्यात आले.


स्पर्धांसाठी ट्रॉफी श्री जे.पी. देसाई, कमिटी मेंबर, विरंगुळा केंद्र_ यांच्यामार्फत पुरस्कृत करण्यात आल्या होत्या. तर रोख रक्कमेची भेट माजी अध्यक्ष श्री मारुती नाना कदम यांनी दिली. श्री बळवंत पाटील यांनी कॅरम साहित्य व्यवस्थित ठेवण्यासाठी संघास एक कपाट भेट म्हणून दिले. सामना संपताच श्री मिठबावकर यांनी उत्स्फूर्तपणे विजेता व उपविजेत्याला रोख रक्कम देऊन कौतुक केले. श्री मधुसूदन जोशी यांनी सुद्धा छोटी भेट दिली.

स्पर्धेच्या दरम्यान सर्वश्री पाटील, बोराडे, कोळी, जोशी मिठबावकर यांनी 3 वेळा लस्सी, चहा, फळ आहार अशी छान मेजवानी सर्व खेळाडूंना व उपस्थितांना दिली. यामुळे स्पर्धेला आपुलकीचा गोडवा लाभला.

महिला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी अध्यक्ष श्री मारुती विश्वासराव यांनी भाषण करताना सदस्य खेळाडूंना भविष्यात लागेल ती सर्व मदत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सौ. सीमा शंकर बोराडे, उपाध्यक्ष यांनी पुढाकार घेतला. आयोजनाची धुरा सर्वश्री राजेश मांडेवाल, संजय शिर्के, गजाभाऊ लोखंडे यांनी सांभाळली.

पुरुषांच्या टीम मेंबर्स व पंच मंडळी श्री बारवाल, संतोष जोशी व श्री खाडिलकर, यांनी महिलांच्या सामन्यांनाही सहाय्य केले. महिलांच्या सामन्यांचे सूत्रसंचालन सौ. आशा कुलकर्णी यांनी केले, तर पुरुषांच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्री सुभाष बारवाल व श्री संजय शिर्के यांनी केले.

या स्पर्धांचे वैशिष्ट्य म्हणजे बक्षीस म्हणून मिळालेली सर्व रक्कम पुरुष खेळाडूंनी कॅरम संघास देणगी म्हणून परत केली. सर्व खेळाडू कॅरम संघाने खास तयार केलेला टी-शर्ट परिधान करून सामन्यात उतरले होते.यामुळे सांघिक भावनेचे दर्शन घडले.

जेष्ठांनी दाखवलेल्या या खेळातील जिद्द व सांघिक वृत्ती सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरली. “वय हे फक्त आकडा आहे” हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments