चला चला मतदान करू हे गीत, गीतकार सुनील देशपांडे यांनी “स्मरा स्मरा हो दत्तगुरू “….या चालीवर रचले आहे. सर्व मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे हा या गीताचा उद्देश असल्याने जास्तीत जास्त लोकांनी, विशेषत: ज्यांचा आवाज चांगला आहे त्यांनी या पद्धतीने या मतदान प्रचारात सामील व्हावे, असे आवाहन श्री देशपांडे यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनाला आपण जरूर प्रतिसाद द्याल, असा विश्वास आहे.
– संपादक
चला चला मतदान करू
लोकराज्य मजबूत करू
लोकशाहीची फळे मधुर हो
मतदानास्तव तुम्ही चतुर हो
योग्य तया मतदान करू
लोकराज्य मजबूत करू
लोकशाही मजबूत हवी जर
पाऊस थंडी गर्मी जरी वर
केंद्रावरती गर्दी करू
लोकराज्य मजबूत करू
लोकशाहीचा उत्सव करूया
सुट्टी पिकनिक नंतर करूया
चला घरा बाहेर पडू
लोकराज्य मजबूत करू
— रचना : सुनील देशपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800