राजेश खन्ना
सुपर स्टार राजेश खन्ना यांचा काल स्मृती दिन होता. या निमित्ताने सिने गायक उदय वाईकर यांनी जागविलेल्या या आठवणी. राजेश खन्ना यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
मी मुंबईस असताना सुपर स्टार राजेश खन्ना व माझा चांगला परिचय होता. त्या काळी मोबाईल फोन नव्हते. तसेच ते अनेकवेळा फोन घेत नसत. अनेकदा किशोर दा (गायक, अभिनेते किशोरकुमार) यांचा मेसेज त्यांच्या पर्यंत द्यायचा असेल तर किशोर दा मला त्यांच्या घरी पाठवायचे. तो निरोप देण्यासाठी मला त्यांच्या घरी डायरेक्ट एन्ट्री मिळत असे व त्यांची भेट होत असे. त्यांचा घरचा सिक्युरिटी स्टाफ मला किशोर दा चां माणूस आहे असं समजून “इसको छोडना पडता है” असे बोलायचे.
मी गेल्यावर अनेक वेळा राजेश खन्ना यांच्या सोबत गप्पा होत असत. लोक म्हणायचे, ते मूडी आहेत. पण मला तो अनुभव कधी आला नाही. त्यांची सुपरस्टार ची कारकीर्द घडविण्यात किशोर दा चा सिंहाचा वाटा होता.
किशोर दा गेल्यानंतर ते तेथे आले होते. तेव्हा ते म्हणाले की, मेरा तो आवाज ही चला गया.. एवढ्या गर्दीत ही ते माझ्याशी बोलले.
आता किशोर दा व राजेश खन्ना दोघे ही नाहीत पण त्यांच्या अनेक आठवणी मनात रुंजी घालत आहेत. सुपर स्टार राजेश खन्ना यांच्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली.
— लेखन : उदय वाईकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800