भ्याड हल्ल्याने
पुसले कुंकू पाकड्यांनी l
भारताने उत्तर दिले
ऑपरेशन सिन्दुर ने ll
भारताने दिला
ठोशास ठोसा l
शूर आम्ही हा दाखवला
जगा आरसा ll
श्री कृष्ण, श्री महावीर,
श्री बुद्धाचे आम्ही दास l
सन्मार्ग सुविचाराचा
आमच्या मनी वास ll
सज्जनास देऊ
घासातला घास l
जागतिक शांतीचा
आमच्या मनी ध्यास ll
अन्यायाचा आम्हा
होतो फारच त्रास l
दुर्जनास देतो
कठीण शिक्षा खास ll
जशास तसे
देतो आम्ही उत्तर l
म्हणून प्रगटला
ऑपरेशन सिन्दुर ll
— रचना : अलका मोहोळकर. पंढरपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ.☎️ 9869484800
👍 छान रचना
,👌👌👌👌👌 छान रचना