नमस्कार मंडळी.
बोलता बोलता वर्ष २०२४ संपत आलंय. आता, आपल्या पोर्टल समोरील एक महत्वाचे आव्हान म्हणजे नवी सदरे सुरू करण्याचे, नव्या लेखमाला सुरू करण्याचे, नवे विषय मांडण्याचे !
सध्या आपल्या पोर्टल वर सुरू असलेल्या राधिका भांडारकर लिखित “जडण घडण”, माधुरी ताम्हणे यांची “माध्यम पन्नाशी” विंग कमांडर श्री शशिकांत ओक यांची “हवा हवाई” या लेखमाला पुढील वर्षातही सुरूच राहतील.
तसेच कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, आरोग्य, पर्यटन, विश्वबंधुत्व, यश कथा, पुस्तक परीक्षण, दिन विशेष आदी विषयांवरील लेखन, कविता प्रसिद्ध होत राहील.
तरी उपरोक्त लेखमाला, विषय या व्यतिरिक्त आपल्याला काही लेख माला, विषय सुचवावयाच्या असल्यास, आपलं स्वागत आहे.
वाचकांनी सुध्दा त्यांना कोणत्या विषयावर अधिक वाचायला आवडेल ते अवश्य कळवावे.
गेले वर्षभर, मिळालेला आपला लोभ नवीन वर्षात अधिकच वाढेल, अशी आशा आहे.
आपली
टीम एनएसटी. ☎️ 9869484800